शिवसेनेच्या वतीने तहसीलदार व ठानेदाराला निवेदन
देऊळगाव राजा : अशरफ पटेल : इस्लाम धर्माचे अंतिम पैगंबर मोहम्मद (सल.) यांच्या बद्दल अक्षपार्य विधान करणारे श्री रामगिरी महाराज यांच्याविरुद्ध कायदेशीर गुन्हा नोंदवा अशी मागणी एका निवेदनाद्वारे शिवसेना अल्पसंख्यक विभागाच्या वतीने केली आहे.
श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथे प्रवचनादरम्यान श्रीराम गिरी महाराज यांनी द्वेष भवानीतून धर्माचे पैगंबर हजरत मोहम्मद सल. यांच्या बद्दल आक्षेपार्य व चुकीचे विधान केले. सोशल माध्यमावर श्रीराम गिरी महाराज यांचे तीन मिनिटांचे प्रवचन व्हायरल होत असून या प्रवचनात इस्लाम धर्माचे अंतिम पैगंबर यांच्या विषयी आक्षेपार्य व खोटे विधान करण्यात आल्याने मुस्लिम समाजा च्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहे. सदर निवेदनात श्री रामगिरी महाराज यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करण्याची मागणी शिवसेना अल्पसंख्यक विभागाच्या वतीनेकरण्यात आली आहे. सदर निवेदनावर शिवसेना अल्पसंख्यक जिल्हाध्यक्ष हाजी सिद्दीक़ कुरेशी, सलीम पठान, अजगर शाह, अमीर खुसरो, शिवाजी वायळ, शेख चांद, सोहेल कुरेशी, सोहेल पठान आदींच्या स्वाक्षरी आहे. सदर निवेदन तहसीलदार आणि ठानेदारा यांना देण्यात आले असून शासनाने समाजात जातिवाद पसरवून कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या संबंधित महाराजाविरुद्ध तात्काळ कारवाई करण्याचे आवाहनअल्पसंख्यक जिल्हाध्यक्ष हाजी सिद्दीक़ कुरेशी शिवसेनेच्या वतीने केले आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांना घरचा आहेर
श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथे प्रवचनादरम्यान श्रीराम गिरी महाराज यांनी द्वेष भवानीतून धर्माचे पैगंबर हजरत मोहम्मद सल. यांच्या बद्दल आक्षेपार्य व चुकीचे विधान केले. त्याचे समर्थन म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा समर्थन केल्यामुळे मुस्लिम समाजामध्ये नाराजी वाढल्याने बुलढाणा जिल्ह्याचे अल्पसंख्याक विभागाकडून मुख्यमंत्री यांचे जाहीर निषेध एका निवेदनद्वारे मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आलेले आहे. निवडणुकीचे काळात मुस्लिम समाजामध्ये मुख्यमंत्री यांच्या बद्दल तीव्र नाराजी असल्याने निवडणुकीच्या परिणाम शिवसेनेला सोसावे लागणार आहे त्यामुळे एक प्रकारचा एकनाथ शिंदे यांना घरचा आहेर देण्यात आला.