देऊळगाव राजा : अशरफ पटेल : तालुका समादेशक होमगार्ड पथक यांच्या वतीने सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांचा सपत्नीक सत्कार व होमगार्ड अधिकारी कै.अरुण चिंचोले यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
स्थानिक छत्रपती श्री शिवाजी महाराज न.प. हायस्कूल च्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा आमदार राजेंद्र शिंगणे होते. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ.रामप्रसादजी शेळके, ठाणेदार संतोष महल्ले, ज्येष्ठ नेते गंगाधरजी जाधव, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजू सिरसाट, शहराध्य कविश जिंतूरकर, विष्णू रामाणे त्याची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी सेवा निवृत्त होमगार्ड कर्मचारी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला या मध्ये हिम्मंत जाधव, बी.टी.सानप व इंगळे हे सपत्नीक हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना तालुका अधिकारी होमगार्ड पथक अँड.रामेश्वर रामाणे यांनी होमगार्ड सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व होमगार्ड पथक देऊळगाव राजा कार्यालयासाठी कायमची जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. व होमगार्ड पुरुष व महिला साठी तात्पुरता निवारा करण्यासाठी टिनशेडची मागणी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे साहेब यांच्या कडे केली व साहेबांनी मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे व माहाराष्ष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करून प्रमुख मागण्या मान्य करण्याचे आवाहन केले व होमगार्ड सैनिकांचा सामाजिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले तसेच मयत अरुण चिंचोले यांच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत दिली आहे तसेच डॉ शेळके साहेब यांनी मार्गदर्शन केले व होमगार्ड सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यांनी केले व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ता. समादेशक अँड.रामाणे, वरिष्ठ पलटण नायक जोगदंड पलटण नायक अंकुश झिंने,जाधव, खांडेभराड, सुनील झिने,आसाराम सानप , पंडित सोलंकी, ज्ञानेश्वर जायेभाये,पवार, महीला होमगार्ड वडतकर, मोरे,खरात, देशमुख व इतर सर्व सन्माननीय होमगार्ड पुरुष व महिला हजर होते.