Matrutirth Express

Dynamic Date and Time
Weekly E-Paper
ई-पेपर
Weekly E-Paper

मागील वर्षाचा पिक विमा तात्काळ द्या.- सौ. खेडेकर

देऊळगाव राजा : अशरफ पटेल : देऊळगाव राजा व सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयावर जिल्हाध्यक्षा सौ रेखाताई खेडेकर यांच्या नेतृत्वात व जिल्हा कार्याध्यक्ष नरेश शेळके, महिला जिल्हा कार्याध्यक्षा गायत्री शिंगणे यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.२२ जुलै रोजी शेतकऱ्यांचा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदार यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी देऊळगाव राजा तहसील कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. स्थानिक बस स्थानक चौकातून जन आक्रोश मोर्चाची सुरुवात होऊन तहसील कार्यालयावर सदर मोर्चाची सांगता करण्यात आली. दरम्यान तसेच इतर वन्यजीवांमुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे प्रचंड नुकसान होत असून शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने शेती कंपाउंड करता शंभर टक्के अनुदान द्यावे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी. मागील वर्षाचा पिक विमा तत्काळ शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करावा. तसेच घरकुल लाभार्थ्यांना घर बांधकाम करण्यासाठी स्वस्त दरात रेती उपलब्ध करून द्यावी, अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला होता. सदर मोर्चात राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा सौ रेखाताई खेडेकर, कार्याध्यक्ष नरेश शेळके, महिला कार्याध्यक्षा गायत्री शिंगणे, राजेंद्र डोईफोडे सर, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रमोद घोंगे, देऊळगाव राजा तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, सिंदखेडराजा तालुका अध्यक्ष राजेंद्र आंभोरे, शहराध्यक्ष विजय खांडेभराड, अमोल भट, रवींद्र इंगळे, अरुण मोगल,अशोक मोगल,युवक तालुका अध्यक्ष गजानन चित्ते, जनार्धन मगर, सुनील झोरे, योगेश शेरे,अजबराव मुंडे, निलेश शिंदे, रावसाहेब गाढवे, संभाजी मुजमुल,इमरान कुरेशी, विकास शिंगणे, विशाल बंगाळे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!