देऊळगाव राजा : अशरफ पटेल : पत्रकारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी व्हॉइस ऑफ मीडिया तालुका पत्रकार संघाने आज (ता.४)तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांनानिवेदन सादर केले. पत्रकारांच्या मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास येत्या १० जुलै रोजी मंत्रालयासमोर उपोषणाची व्याप्ती वाढविण्यात येईल असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला.
समाजाच्या विविध विषयावर आपली लेखनी झिजवत महत्वपूर्ण प्रश्न तडीस लावणाऱ्या पत्रकारांच्या अनेक न्याय हक्काच्या मागण्या सरकार दरबारी प्रलंबित आहे. पत्रकारांच्या अशा विविध प्रश्नांवर व्हाईस ऑफ मीडिया राज्य, देश नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करीत आहे. महाराष्ट्र शासनाकडे या अगोदर देखील विविध मागण्या संदर्भात निवेदन आणि आंदोलने स्वरूपात पाठपुरावा करण्यात आलेला आहे. त्याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून आज देखील व्हॉइस ऑफ मीडिया तालुका पत्रकार संघाने तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पत्रकारांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी निवेदन दिले. यामध्ये विधानसभा निवडणुकीत, सणवार, उत्सव,या काळात यादीवरील सर्व छोटे दैनिक सर्व साप्ताहिक, न्यूज पोर्टल युट्युब चॅनेल यांनाही शासकीय जाहिराती देण्यात याव्या, आर एन आय कडून नवीन निकषानुसार लादण्यात आलेल्या जाचक अटी रद्द करा, पत्रकारांच्या अशा विविध समस्या राज्य शासनाने तात्काळ सोडविण्यात याव्या या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना जिल्हा उपाध्यक्ष मुशिरखान कोटकर, तालुकाध्यक्ष अर्जुन आंधळे, सुनील मतकर, सुषमा राऊत, अमोल बोबडे, अशरफ पटेल, विलास जगताप, सनमती जैन,गजानन घुगे, देवानंद झोटे आदींची उपस्थिती होती.