शाळेच्या वेळेत मोबाईल बंद….!
या वर्षी पासुन १ ली, २ री सेमी इंग्रजी…!
देऊळगांव राजा : अशरफ पटेल : जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढावी पालकांचा दर्जेदार शिक्षणाकडे असणारा कल तसेच जिल्हा परीषद शिक्षकाची समाजात प्रतिष्ठा वाढावी या दृष्टीने तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना एकत्र येऊन… गटशिक्षण अधिकारी दादाराव मुसदवाले यांचे मार्गदर्शनाखाली शैक्षणिक वर्ष २०२४ – २५ पासून काही महत्त्वाचे प्रेरणादायी निर्णय घेतले आहेत.
जिल्हा परीषद शाळांचा शैक्षणिक दर्जा उत्तम असून तो आणखी वाढवा, पालकांचा इंग्रजी शिक्षणाकडे वाढता कल त्यामुळे जिल्हा परीषद शाळांची कमी होणारी पटसंख्या यावर अनेक उपाय योजना केल्या जातात. तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा मागील काही वर्षा पासुन उंचावला आहे… तरीही पालकांच्या वाढत्या अपेक्षा लक्षात घेता शिक्षकांनी एकत्र येऊन शिक्षक संघटनेच्या माध्यमातून स्वयं प्रेरणेने काही निर्णय घेतले आहेत.. ज्यामध्ये शालेय वेळेत कोणीही शिक्षक मोबाईल चां व्यक्तिगत वापर करणार नाही शैक्षणीक कामासाठी अथवा अध्यापनासाठी वापर करायचा असल्यास मुख्याध्यापक यांचे परवानगीने व देखरेखी खाली करता येईल. तसेच पालकांचा इंग्रजी शिक्षणाकडे वाढता कल लक्षात घेता या वर्षी पासुन ई १ ली २ री मध्ये सेमी इंग्रजी सुरु करण्यात येणार आहे, तसेच दरमहा वर्ग निहाय पालक सभा आयोजित करण्यात येइल. ई ५ वी ८ वी स्कॉलरशिप, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, एनएमएमएस परीक्षा यांचे अतिरीक्त वर्ग घेण्यात येईल तरी पालकांनी आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेतच आपले पाल्यांचां प्रेवेश घ्यावा असे आवाहन सर्व जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक संघ व सर्व शिक्षक संघटना यांचे वतीने करण्यात येते.