देऊळगांव राजा : प्रतिनिधी : तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांना तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन देण्यात आले त्यामध्ये काँग्रेस चा वतीने कृषी विभागाचा भोंगळ कारभारावर गंभीर आरोप करण्यात आले ऐन पेरणीच्या तोंडावर सुरू असलेली शेतकऱ्यांची लूट आपण उघड्या डोळ्यांनी बघत आहात अगोदरच शेतकरी मागील वर्षी दुष्काळामध्ये होरपळून निघाला आहे यावर्षी चांगल्या हवामानाचे व पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. म्हणून शेतकरी पेरणीसाठी आवश्यक अशी बी-बियाणे खरेदी करण्याकरिता कृषी केंद्रावर जात आहेत परंतु तेथे सुद्धा संपूर्ण तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची ऑन च्या नावाखाली मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांना पाहिजे ते बी-बियाणे योग्य दरात उपलब्ध झाले नाही तर शेतकऱ्यांनी या संदर्भात न्याय कोणाकडे मागायचा अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती बि- बियाणे आपल्या स्तरावर योग्य दरात उपलब्ध करून देण्यात यावे तसेच तालुक्यातील कोणकोणत्या कंपनीची बी-बियाणे कोणत्या कृषी केंद्रावर किती प्रमाणात उपलब्ध आहे व सदर उपलब्ध बी-बियाणे त्यांनी किती शेतकऱ्यांना वाटप केले याची संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात यावी व शेतकऱ्याची सुरू असलेली लूट आपल्या स्तरावरून ताबडतोब थांबवावी अन्यथा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुका कृषी कार्यालय देऊळगाव राजा समोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामाला कृषी विभाग जबाबदार राहील अशा आशयाचे निवेदन आज तालुका काँग्रेस कमिटी तसेच शहर काँग्रेस कमिटी यांच्या वतीने दि.७ जून रोजी तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मनोज कायंदे, रमेश कायंदे, दिलीप सानप, लक्ष्मण कव्हळे तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष गजानन काकड, शहराध्यक्ष विष्णू झोरे, हनीफ शहा, गजानन तिडके, अशोक डोईफोडे, अमर शेटे, गणेश सरोदे, मुन्ना ठाकुर, सचिन मुढे, विठ्ठल सरोदे, नितीन पाटोळे, मुबारक खान आदी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.