ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशन मुंबई चे अध्यक्ष हाजी इकबाल मेमन ऑफिसर यांचे प्रतिपादन
युथविंग कन्व्हेंशन २०२४ चे बोइसर येथे आयोजन
बोईसर (जिल्हा पालघर) : अशरफ पटेल : आजचा तरुण युवक म्हणजे देशाचा सर्वात मोठा शक्तिशाली विचाराने परिपक्व भविष्याचा वेध घेणारा भविष्यातील देशाचा कणा होय देशातील युवा वर्ग हा देशाचा एक शक्तिशाली दुवा आहे. युवाशक्ती म्हणजे तरुण पिढी होय प्रत्यक्षात विविध क्षेत्रात कार्य करण्यासाठी तरुण युवक खूप गरज व आवश्यकता आहे. समाजातील ज्येष्ठ अनुभवी तज्ञांचे मार्गदर्शन व दिशा यांना मिळणे हे खूप महत्त्वाचे आहे आजच्या युवकाला जर योग्य दिशा व सरळ जीवनातला रस्ता मिळाला तर युवक समाजासाठी कार्य करीत राहणार असे प्रतिपादन ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशन मुंबई चे अध्यक्ष हाजी इकबाल मेमन ऑफिसर यांनी केले.
दि.१ जून रोजी पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशन युथविंग बोईसर व बोईसर मेमन जमाच्या वतीने युथ कन्वेषण २०२४ चे आयोजन पुरोहित हॉल येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे चिफगेस्ट म्हणून ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशन मुंबई चे अध्यक्ष हाजी इकबाल मेमन ऑफिसर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अज़ीज़ मछीवाला, इमरान फ्रुटवाला, शाकिर भाई बाटलीवाला, रफीक भोजानी, सलमान छत्रीवाला, पारसी समाजाचे प्रॉफेसर श्रॉफ़, यासीन मेमन आदि उपस्थित होते. सर्वप्रथम मौलाना मोहम्मद असलम यांनी तीलावते कुराण चा पठन केले. तदनंतर राष्ट्रगीत आणि मेमन एंथम करुण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी ऑल इंडिया मेमन जमात युथविंग बोईसर इंचार्ज शेहजाद मेमन यांनी आज पर्यंत कामांचा लेखा जोखा सर्वा समोर मंडला. तसेच आज सकाळी रक्तदान शिबीर चे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीर मधे ४२ रक्तदात्यानी रक्तदान करुण देशात होणाऱ्या रक्ताच्या तुटवाल्यात हातभार लावला. यावेळी मकसूद खैराणी, रफिक भोजानी, सलमान छत्रीवाला, नारायण कोटकर, वसीम नवीवाला, अज़ीज़ मच्छीवाला, प्रोफेसर श्रॉफ यांनी मनोगत व्यक्त केले. या यूथ विंग कंवहेंशन साठी देशाच्या कानाकोपर्यातुन वॉइस प्रसिडेंट, झोनल सेक्टरी, डिजास्टर मैनजमेंट, सर्व उपस्थित होते. पुढे बोलताना ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशन मुंबईचे अध्यक्ष हाजी इकबाल मेमन ऑफिसर म्हणाले की, ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशन आता मोठे काम करणार आहे त्यात सर्व प्रथम एजुकेशन मधे विद्यालय आणि शाळे उभरण्यात येणार आहे. त्याची सुरवात परभणी पासून सुरु होणार आहे. आता जमात आपल्या पायावर अभी राहन्यासाठी काम करण्याची गरज आहे.
कार्यकमाचे सूत्रसंचालन आणि आभार मोहम्मद मेमन यांनी केले. कार्यकर्माच्या यशश्वीते साठी आवेश जूनागड़वाला, जावेद कासमानी, जाहिद खैरानी, रईस मेमन, अ. कदीर, शाकिर बावला, शहजाद मेमन, अब्दुल रहमान खाखु, यानी केले. यावेळी बोईसर मेमन जमात चे पादधिकारी व सदस्य, यूथ विंग चे सर्व पदाधिकारी व सदस्य महिला आदि उपस्थित होते.
ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशन युथविंगचे चेअरमन इमरान फ्रुटवाला यांनी सांगितले की, आज देशात ७३ यूथ विंग ची स्थापना झालेली आहे. येणाऱ्या काळात डॉक्टर, लॉयर, एजुकेशन, व्यापार, नौकरी, या क्षेत्रात कार्य करीत आहे. तसेच नुकतेच यूथ विंग बोईसर च्या वतीने जातिपाती ना बघता ट्रेन अपघातात जख्मी झालेल्या रुग्णालयात घेऊन जाने आणि काहीना मदत दिली ही वख्यंयन जोग आहे. येणाऱ्या काळात खुप कामे करने आहे.