देऊळगाव राजा : प्रतिनिधी : स्थानिक बसस्थानक चौकात भाजपाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यात आला . विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा फोटो फाडून जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे. याच्या निषेधार्थ भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जितेंद्रआव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध केला व घोषणाबाजी केली .
दि.२९ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा भाजपच्या वतीने निषेध करण्यात आले याप्रसंगी जिल्हाध्यक्ष डॉ गणेश मांटे, भाजपा ओबीसी नेते डॉ सुनील कायंदे, जिल्हा सचिव डॉ शंकर तलबे, दलित आघाडीचे नेते यादवराव भालेराव जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ काकड, तालुकाध्यक्ष संजय मुंढे, शहराध्यक्ष संजय तिडके, राजेश भुतडा, प्रवीण धन्नावत, संचित धन्नावत, आदर्श गुप्ता, सुजित गुंडे, धर्मराज हनुमंते, श्रीराम बर्डे, गबाजी कुटे, सुधाकर गीते, संजय ईलग आदी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.