Matrutirth Express

Dynamic Date and Time
Weekly E-Paper
ई-पेपर
Weekly E-Paper

देउळगावराजा : अशरफ पटेल : संतचोखासागर (खडकपूर्णा) प्रकल्प क्षेत्रात रेती माफियांनी चांगलीच धुमाकूळ घातलीय आहे. महसूल विभागाला प्रत्येकवेळी पाण्यातून रेती उपसा करणाऱ्या बोटीचा शोध घेणे व त्या बोटी नष्ट करणे हे प्रकारे चॅलेंज ठरत आहे.परंतु आता रेती माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी महसूल विभागाने देखील चांगलीच कंबर कसली आहे. बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या निर्देशानुसार, व सिंदखेड राजा महसूल उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनात बुलढाणा जिल्हास्तरीय शोध व बचाव पथकाच्या माध्यमातून बोटीचा शोध घेऊन दि.21 मे रोजी संतचोखासागर (खडकपूर्णा ) प्रकल्पातुन मौजे चिंचखेड येथे वाळूचे उत्खनन करणाऱ्या तीन बोटी व त्याला लागणारे साहित्य आणि पाईप्स जागेवर नष्ट करण्यात आले आहे. सदर महसूल विभागाच्या कारवाईने रेती माफियांचे धाबे चांगलेच दणानले आहे.मागील दोन महिन्याअगोदर फेब्रुवारी २०२४ च्या एकाच आठवड्यात महसूल विभागाने अवैध रेती उपसा करणाऱ्या चार बोटी नष्ट केल्या होत्या परंतु झालेल्या कारवाईला न जुमनता रेती माफियांनी पुन्हा आपले बोटीचे जाळे खडकपूर्णा प्रकल्पात मोठया हिंमतीने पसरवले आहे. खरं तर आता यापुढे महसूल विभागाने पोलीस प्रशासनाची मदत घेऊन रेती माफियांच्या मुसक्या आवळणे ही महत्वपूर्ण जबाबदारी आता महसूल विभागाची ठरणार आहे. सदर साहित्य मोक्यावरून वाहतूक करून हलविणे शक्य नसल्याने उपरोक्त नमूद केलेल्या ३ बोटी व फायबर, सेक्शन पाईप, इंजिन तसेच इतर साहित्य जागेवर नष्ट करण्यात आहे. सदर कारवाई सिंदखेड राजा तहसीलदार प्रविण धानोरकर, देऊळगांव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, परिविक्षाधीन नायब तहसीलदार प्रांजल पवार, आपत्ती व्यवस्थापनच्या शोध व बचाव पथकाचे प्रमुख ए. एस. आय. तारासिंग पवार, सहकारी एच. सी. रशीद पटेल, श्रीकांत गाडे, संदीप पाटील, अमोल वाणी, गुलाबसिंग राजपूत, सलीम बर्डे, प्रदीप सोनावणे, संतोष साबळे, मंडळअधिकारी रामदास मांटे, ईप्पर, वायडे, तलाठी सरिता वाघ, ज्योती लोखंडे, पी.डी. बुरुकुल, पि.टी. जायभाये, एस. एस.वाकोडे,एस. टी. हांडे,एम. के. जारवाल, एस. ए. देशपांडे, आकाश खरात, तेजस शेटे, कोतवाल विठ्ठल हरणे, आकाश मघाडे, वाहन चालक एन. बी. उबाळे, चव्हाण यांनी कारवाई करिता परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!