देऊळगांव राजा : अशरफ पटेल : विद्यार्थ्यांना खूप शिकायची ईच्छा असते परंतु त्यासाठी गरीबी मोठा अडसर ठरते..हा अडसर आरसीएफ अँग्रीकल्चर कंपनीच्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला. आपण काही केलं पाहिजे या विचारातून एकत्र येत विद्यार्थ्यांच्यां स्वप्नाला आकार देण्यासाठी त्यांना त्याच्यां पायावर उभे करण्यासाठी आपल्या पगारातील काही भाग बाजूला टाकला जमलेल्या त्या पैशातून गरीब विद्यार्थ्यांची शाळेकडून यादी घेत त्यांना फुल ना फुलांची पाकळी म्हणून आर्थिक मदत ही मडंळी करत आहेत. असे विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम करणा-या आरसीएफ कंपनी सारखे सामाजिक भान आपण सर्वांनी जपले पाहिजे असे विचार विचारवंत प्रा.कमलेश खिल्लारे यांनी दि.१८ मे रोजी आशाताई सार्वजनिक वाचनालय येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले..या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श शेतकरी वामनराव शिंगणे हे होते तर प्रमुख पाहूणे बुलढाणा अनिस अध्यक्ष प्रदिप हिवाळे, स्वप्निल खिल्लारे, राजेंद्र मस्के, ज्ञानेश्वर झिणे हे होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्काँलरशिपवर परदेशात शिकून एक ईतिहास घडवला..तुम्ही ही या मदतीचा फायदा घेऊन. शिकून डॉक्टर , इंजिनिअर , प्राध्यापक, अधिकारी, समाजसेवक होऊन आपल्या परिवारासाठी का होईना एक ईतिहास घडवा अशा शुभेच्छा देत प्रा. कमलेश सरांनी मार्गदर्शन केले. प्रदिप हिवाळे यांनी लढण्यासाठी बळ देणा-या या कंपनीचे आभार मानत. जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांन पर्यंत पोहचण्यासाठी आपण सामूहिक प्रयत्न करू असे सांगितले अध्यक्षीय भाषणात वामनराव शिंगणे यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगत. विद्यार्थ्यांनी वाचन वाढवले पाहिजे कारण चांगल वाईट कळण्यासाठी पुस्तके फार मदत करत असतात त्यामुळे ग्रंथालयाशी मैत्री वाढवा असे सांगितले..कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सुत्रसंचालन विनोद खिल्लारे यांनी केले. या वेळी विद्यार्थी आणि पालक बहुसंखेने हजर होते.