देऊळगांव राजा : अशरफ पटेल : एकीकडं कमालीची उष्णता, अचानक होणारा वादळी वाऱ्यासह पाऊस आणि सतत बदलणारं वातावरण यामुळं तालुक्यातील शेतकरी चिंतेत आलाय. तर दुसरीकडं शहर आणि परिसरात दोन वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने बाजार समीती परिसरात दुकानांचे टीन पत्रे उडाल्याने अन्नधान्याचा नुकसान झाल्याची घटना घडली.
दि.१४ मे रोजी अचानक संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहरातील आणि ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी वीज पुरवठाही खंडित झाला होता. शिवाय तालुक्यात अनेक भागात झाडे उमळून पडली, तर काही ठिकाणी घरावरची पत्रे उडून अनेकांचे संसार उघड्यावरती पडले होते. शहरातील बाजार समीतीतील काही दुकानांचे टिन पत्रे उडाल्याने अन्नधान्य व किराणा मालाचा मोठा झालेला आहे. तसेच परिसरसह वीजपुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांना त्रासाला समोर जावं लागलं.