Matrutirth Express

Dynamic Date and Time
Weekly E-Paper
ई-पेपर
Weekly E-Paper

देऊळगाव राजा : अशरफ पटेल : येथील शासनाने करोडो रुपये खर्च करून तयार केलेले शासकीय ट्रामा केअर सेंटर दहा वर्षांपासून धुळखात बंद अवस्थेत आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील व परिसरातील अपघातग्रस्तांना जिल्हास्तरीय रुग्णालयात रेफर करण्याची वेळ येत आहे. अपघात ग्रस्त रुग्णांना वेळेत उपचार मिळावे म्हणून बंद असलेले ट्रॉमा केअर सेंटर तात्काळ कार्यान्वित करावे, अन्यथा डफडे बजाव आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार ) तालुका अध्यक्ष राजेश इंगळे यांनी दि.१३ मे रोजी उपसंचालक आरोग्य विभाग अकोला यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.
राष्ट्रवादीने दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, देऊळगाव राजा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात परिसरातील व ग्रामीण भागातील अपघातग्रस्तांना तात्काळ उपचार मिळावे या हेतूने दहा वर्षांपूर्वी शासनाने करोडो रुपये खर्च करून ट्रामा केअर युनिटची भव्य इमारत तयार केली आहे. मात्र ट्रामा केअर युनिटमध्ये शस्त्रक्रिया साठी लागणारे उपकरणे उपलब्ध नाही. महत्वाचे म्हणजे सदर ट्रामा केअर सेंटर मध्ये अस्थिरोग तज्ञ,भूलतज्ञ यांच्या शासन स्तरावरून नेमणूक झालेले नाही. परिणामी देऊळगाव राजा शहरापासून २० किमी पर्यंत अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना तात्काळ सेवा दिली जात नाही. त्यामुळे रुग्णाच्या जीवित्वास धोका निर्माण होतो. विशेषता नागपूर – पुणे राष्ट्रीय महामार्ग आणि या राष्ट्रीय महामार्ग लगतच्या भागात नेहमीच वाहनाची गर्दी असल्याने नेहमी अपघात घडत असतात. अपघात झाल्यास जखमींना उपचारासाठी रेफर टू जालना किंवा औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल करावे लागते. परिणामी अपघातग्रस्तांच्या जीवाला धोका निर्माण होतो. येथील ट्रामा केअर युनिट सुरू झाल्यास अपघातग्रस्तांवर वेळेत शस्त्रक्रिया होऊ शकते. त्यांना दुसरीकडे रेफर करण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे शासनाने करोड रुपये खर्च करून ज्या उद्देशासाठी ट्रामा केअर यूनिटची भव्यदिव्य इमारत तयार केली आहे. तो उद्देश साध्य करून ट्रामा केअर सेंटर मध्ये आवश्यक उपकरणे, तज्ञ डॉक्टर तात्काळ उपलब्ध करून, बंद अवस्थेत असलेले ट्रामा केअर युनिट तात्काळ कार्यान्वित करावे, अन्यथा डफडे बजाव आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, तालुका सचिव जहीर पठाण,जना मगर,विजय खांडेभराड, आजमत खान,शंकर वाघमारे, निलेश शिंदे,असलम खान, मुबारक चाऊस,राजू गव्हाणे,आदींनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!