देऊळगाव राजा : अशरफ पटेल : घराचे ग्रील्स दरवाजेचे कुलुप तोडून किचनमधील वॉल ड्रॉप मध्ये ठेवलेले चांदीचे भांडे असा ७० हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दि.५ मे रोजी शहरातील मध्यभागात घडली.
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार देऊळगाव राजा येथील राजे संजय मानसिंगराव जाधव (वय ५५) यांच्या जुनी नगरपरिषद मागील घराचे ग्रील दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील तीन चांदीचे ताट प्रत्येक वजन ४०० ग्रॅम, चार चांदीचे वाट्या प्रत्येक वजन दीडशे ग्रॅम असे एकूण ८०० ग्राम चांदी किंमत ७० हजार रुपये चा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले राजे संजय जाधव यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे.