Matrutirth Express

Dynamic Date and Time
Weekly E-Paper
ई-पेपर
Weekly E-Paper

सिंदखेड राजा : अशरफ पटेल : विदर्भाची उपराजधानी समजल्या जाणाऱ्या मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे राजमाता राष्ट्रमाता आईसाहेब जिजाऊ जन्मस्थळी प्रथमच चित्रनगरी अर्थात सिनेमा सृष्टी उभी राहत आहे मोती तलाव जवळ निसर्ग रम्य ठिकाणी निर्माते सुनील शेळके यांच्या अथक परिश्रमाने चित्रपट सृष्टी उभी राहत आहे. त्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे गेल्या एक महिन्यापासून असंख्य कामगार येथे राबताना दिसून येत आहे.
चित्रपट सृष्टी म्हटली म्हणजे आपल्या डोळ्यासमोर मुंबई लोणावळा यासह अन्य स्थळे उभे राहतात परंतु प्रथमच आपल्या मायभूमीत निर्माते सुनील शेळके यांनी मोठे धाडस व हिम्मत दाखवून जिजाऊ च्या जन्मस्थळ असल्याचे सिंदखेडराजा निवडले या चित्रनगरीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांना विविध सिनेमांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होणार आहे तसेच स्थानिक कामगारांना तिथे काम मिळणार आहे. यानिमित्ताने रोजगाराच्या अनेक संधी प्राप्त होणार आहे निर्माते सुनील शेळके यांच्या कल्पक व दूरदृष्टीकोनातून हा फार मोठा भव्य प्रकल्प उभा राहत आहे. जेणेकरून सिंदखेडराजा नगरीतील वैभवात भर पडणार आहे या चित्रपटसृष्टीमुळे एकंदरीत सिंदखेड राजा परिसराला अनेक दृष्टीने फायदा होणार आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या कला, सांस्कृतिक, व्यापार व पर्यटन क्षेत्रामध्ये यामुळे मोठी भर पडणार असून जिल्ह्याचा नावलौकिक हा देशभर होणार आहे. तसेच जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.


निर्माते सुनील शेळके व काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस जयश्रीताई शेळके यांनी गेल्या अनेक वर्षांपासून १२ जानेवारी जिजाऊ जन्मोत्सवासाठी सिंदखेडराजा येथे राज्यस्तरीय कृषी संमेलन घेतात कोणताही प्रकल्प, कोणताही विषय राजमाता जिजाऊ यांचे दर्शन घेऊन सिंदखेडराजा येथून सुरू करण्याची शेळके दाम्पत्याची परंपरा आहे.


निर्माते सुनील शेळके यांनी दोन वर्षांपूर्वी उपजिल्हाधिकारी पदाचा राजीनामा दिला आणि आपण इतरांसाठी समाजासाठी काही केले पाहिजे हा मोठा उदांत दृष्टिकोन समोर ठेवून त्यांनी सिंदखेडराजा येथे सुशिक्षित बेरोजगार यांना नोकरी देण्यासाठी मेळावे घेतले. जिल्हा भरात त्यांचे विविध उपक्रम सुरू असतात. सिनेमासृष्टीत पाऊल ठेवण्याचा त्यांचा निर्णय निश्चितच बुलढाणा जिल्ह्याच्या विकासात भर टाकेल एवढा मोठा आहे


महात्मा फुले यांच्या जीवनावर “सत्यशोधक” हा सिनेमा त्यांनी काढला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर “महापरिनिर्वाण” हा सिनेमा त्यांचा येत आहे सध्या काम सुरू आहे सिनेमा सृष्टी सुद्धा त्यांनी इतर निर्मितीपेक्षा वेगळे विषयी घेऊन त्याचा वेगळ्या अँगलने काम सुरू केले त्याला यश असलेचे चित्र सुद्धा दिसून येत आहे.

 

निर्माते सुनील शेळके यांच्याशी संपर्क साधला असता ” राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब आमची अस्मिता असून या स्थळाचे जगभरात महत्त्व वाढवे म्हणून आमचा हा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात याठिकाणी देशभरातील चित्रपटांचे चित्रीकरण केले जाईल. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याचा लौकिक नक्कीच वाढेल असेही ते म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!