देऊळगाव राजा : (प्रतिनिधी): राज्यातील दोन लोकसभा निवडणुकीच्या टप्पा पार पडला असून राज्यातील अन्य काही टप्प्यासाठी निवडणूक पार पडत आहे यासाठी ज्या ज्या परिसरात निवडणुका संपन्न झाल्या त्या परिसरातील अनुभवी नेत्यांचा अन्य उमेदवारांना फायदा व्हावा यासाठी विविध राजकीय पक्षांनी अनुभवी उमेदवारांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे यामध्ये मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांची छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघातील छत्रपती संभाजी नगर मध्य या विधानसभा क्षेत्रासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केली आहे. डॉ. शशिकांत खेडेकर यांना विविध निवडणुकीचा अनुभव असून अभ्यासू नेतृत्व म्हणून पक्षांमध्ये त्यांची ओळख आहे त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाच्या उमेदवाराला व्हावा यासाठी त्यांची निवड ही महत्त्वपूर्ण मानली जात आहे