देऊळगांव राजा : अशरफ पटेल : एकीकडे संत चोखा सागर खड़कपूर्णा धरणात पाण्याचे संकट दिवसेंदिवस भीषण रुप धारण करीत असताना उपाययोजनांच्या पातळीवर दिलासा म्हणून नगर पालिकेचे मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी शहरला सुरळीत व्हावे यासाठी प्रयत्न करीत आहे. सध्याच्या अभूतपूर्व पाणीटंचाईमुळे पाण्याचा ‘थेंबन् थेंब’ महत्वाचा असल्याच्या पार्श्वभूमीवर शहराला पाणीपुरवठा करते वेळी मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे. काही अनुभावी रस्त्यावर पाण्याचा गैर वापर करतांना दिसून येत आहे. त्यामुळे पाण्याचा वापर योग्य व्हावा सध्या चर्चेचा विषय बनले आहेत.
तालुक्यात संत चोखा सागर खड़कपूर्णा धरणात अल्प जलसाठा आहे. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच अल्प जलसाठा असल्याने आगामी उन्हाळ्यात तलाव सुकण्याची शक्यता आहे. या धरणात जंगलातील वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी येतात. धरणातील पाणी सुकल्यास वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. तसेच सिंदखेडराजा आणि देऊळगांव राजा शाहराला पाणी पुरवठा करण्यासाठी उपाय योजना करण्यात आलेली आहे. यावर्षी अत्यंत कमी पाऊसा मुळे धरणात जलसाठा कमी झाल्याने दोन्ही शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न गंभीर होत चालला आहे. पिण्याचे पाणी घरगुती वापरासाठी योग्यरीत्या वापरावे. पाणी शिळे होत नाही. त्यामुळे शिल्लक पाणी फेकून न देता त्याचा वापर करावा. पिण्याच्या पाण्याचा वापर वाहने स्वच्छ करणे, बागकाम व कुंड्यांसाठी, घर/इमारत परिसर स्वच्छ करण्यासाठी, धुण्यासाठी वापर करू नये. नागरिकांनी ज्यांच्या घरी बोअरवेल सुस्थितीत ठेवून त्याचे पाणी सदनिकांमध्ये स्वच्छतागृह, सोसायटी अंतर्गत उद्यान परिसराची स्वच्छता करण्यासाठी वापरावे.’ पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास बचत होणार आहे. किमान जून किंवा जुलैपर्यंत पाणी सर्वांना पुरेसे उपलब्ध होऊ शकेल. पाणीटंचाईचे संकट ओढवून न घेता यंदाचा उन्हाळा सुसह्य होईल, याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी.’ कारण संत चोखा सागर खड़कपूर्णा धरणाची पाणीपातळी कमी झाल्याने पाण्याचा संकट वाढला आहे.
पाण्याचा वापर कटकसरिने करा : मुख्याधिकारी मोकळ यंदा अत्यअल्प पावसाने दांडी मारली त्यामुळे खड़कपूर्णा धरणात अत्यंत कमी जलसाठा असल्याने शहरात पाणीटंचाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी आतापासूनच पाण्याचा वापर काटकसरीने करावा. पाण्याची उधळपट्टी थांबवावी. असे आवाहन मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी केले आहे.