Matrutirth Express

Dynamic Date and Time
Weekly E-Paper
ई-पेपर
Weekly E-Paper

देऊळगांव राजा : अशरफ पटेल : या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून देऊळगांव राजा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मुसदवाले साहेब उपस्थीत होते . या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य एस.के.देशमूख हे होते. छत्रपती श्री शिवाजी महाराज नगर परिषद हायस्कूल , देऊळगांव राजा येथे इयत्ता नववी ते बारावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी समग्र शिक्षा अंतर्गत सन् २०१५ पासून व्यवसाय शिक्षण योजना सुरू असून इयत्ता बारावी च्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच रोजगाराची व व्यावसायिक कौशल्याची माहिती व ज्ञान मिळावे यासाठी ८० तास इंटर्नशिप करणे गरजेचे असते. त्या अनुषंगाने व्यवसायासाठी आवश्यक असणारे कौशल्य प्राप्त करून घेणे तसेच रोजगार कौशल्य, ग्राहक संवाद, ग्राहकांसोबत व्यवहार या गोष्टींचे ज्ञान मिळवणे व ते दैनंदिन व्यवहारामध्ये आमलात आणणे हा इंटर्नशिप चा मुख्य उद्देश होता. यासाठी ॲग्रीकल्चर विषयाच्या १० विद्यार्थ्यांनी पिंगांक्ष कृषी केंद्र व शिव कृषी केंद्र दे.राजा येथे तर ॲटोमोबाइल विषयाच्या ४ विद्यार्थ्यांनी समर्थ ॲटो पार्टस् टेंभूर्णी याठिकाणी आपली ८० तासाची इंटर्नशिप पूर्ण करून त्याचे प्रशिक्षण.घेतले. या कार्यक्रमासाठी शाळेतील मल्टीस्किल -कृषी विषयाचे व्यवसाय प्रशिक्षक सतिष राऊत व ऑटोमोबाईल विषयाचे व्यवसाय प्रशिक्षक गणेश लद्दड यांनी विद्यार्थ्यांची इंटर्नशिप पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व मदत केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व्यवसाय प्रशिक्षक सतीष राऊत यांनि केले .

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!