देऊळगाव राजा : श्री रामनवमी निमित्त देऊळगाव राजा शहरातील माळीपुरा व वाल्मीक नगर येथील श्रीराम मंदिर येथे दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव विवीध धार्मिक कार्यक्रम घेऊन भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला . प्रभू श्री रामचंद्राची अभिषेक पूजा व महाआरती करण्यात आली आणि प्रसादाचे वितरण करण्यात आले .सायंकाळी शहरातून श्री रामचंद्राची भव्य शोभायात्रा मिरवणूक वाजत गाजत करण्यात आली .
शहरातील माळीपुरा येथील श्रीराम मंदिर येथून सायंकाळी सहा वाजता श्री प्रभू रामचंद्राची भव्य मूर्ती ट्रॅक्टर वर सजविण्यात आली .दुसऱ्या ट्रॅक्टर वर राम लक्ष्मण सीता हनुमान व लंकेश्वर रावण यांचा देखावा करण्यात आला . वाजत गाजत शहरातील प्रमुख मार्गावरून श्रीराम शिवबा यात्रा काढण्यात आली . ग्रामदैवत श्री बालाजी मंदिर समोर प्रभू श्री रामचंद्राची महाआरती करण्यात आली . यावेळेस जय श्री रामाच्या जय घोषाने बालाजी मंदिर परिसर दुमदुमून गेले . भगव्या पताकाडीजेच्या स्वरामध्ये युवकांनी नाचत शोभायात्रा मध्ये सहभाग घेतला .जागोजागी फटाक्याची आतिशबाजी करण्यात आली . या शोभायात्राला शहरातील माळीपुरा येथून सुरुवात झाली . त्यानंतर बालाजी फरस ,शनिवार पेठ , आंबेडकर चौक , मेन रोड ,जुना जालना रोड , वाल्मिक नगर ,अग्रसेन चौक , महात्मा फुले चौक , अहिंसा मार्गाने मिरवणूक निघाली . श्री चौंडेश्वरी मंदिर येथे श्रीराम मिरवणुकीची सांगता करण्यात आली . या मिरवणुकीमध्ये श्रीराम भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . श्रीराम शोभा यात्रेचे आयोजन श्रीराम मंदिर माळीपुरा तथा शहरातील समस्त श्रीरामभक्त यांनी केले होते .उपविभागीय पोलीस अधिकारी मॅडम व पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.शांततामय वातावरणात देऊळगाव राजा शहरात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला .