देऊळगांव राजा : अशरफ पटेल : मा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला असून दिनांक १६ मार्च पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. सदर निवडणुकीच्या अनुषंगाने दि. १८ एप्रिल आणि १९ एप्रिल रोजी ई. व्ही. एम. आणि व्ही. व्ही. पॅट मशीन सिलिंग करण्याचे काम आजपासून मा. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाले आहे.
बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या सिंदखेडराजा मतदारसंघांमध्ये ई.व्ही. एम. आणी व्ही.व्ही पॅट मतदान यंत्र याबाबत तालुक्याला एकूण (कंट्रोल युनिट (CU) ४२०, एकूण बॅलेट युनिट (BU) ४२०, VVPAT ४५२ प्राप्त झाले आहेत त्या सर्व ई.व्ही. एम. आणी व्ही.व्ही पॅट मशीनचे सिलिंगचे काम आज दि.१८ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरु झाले आहे. आजच्या या ई.व्ही.एम आणि व्ही. व्ही. पॅट मशीनचे सिलिंगचे कामासाठी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती मनीषा कदम, तहसीलदार सिंदखेडराजा प्रवीण धानोरकर, तहसीलदार देऊळगाव राजा श्रीमती वैशाली डोंगरजाळ, नायब तहसीलदार मनोज सातव, नायब तहसीलदार श्रीमती डॉ.अस्मा मुजावर, गटविकास अधिकारी सिंदखेडराजा डॉ. श्रीकृष्ण वेणीकर, गटविकास अधिकारी देऊळगांव राजा मुकेश महोर , मुख्याधिकारी सिंदखेड राजा प्रशांत व्हटकर, मुख्याधिकारी देऊळगावराजा अरुण मोकळ, नायब तहसीलदार नितीन बढे, नायब तहसीलदार श्रीमती प्रांजल पवार, प्रसार माध्यम नोडल अधिकारी अंकुश म्हस्के, उमेश गरकळ, प्रकाश शिंदे, संजय सोनुने तसेच सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.