परप्रांतीय अपघातग्रस्तासाठी डॉक्टर ठरले देवदूत
देऊळगाव राजा : अशरफ पटेल : अपघातात गंभीरित्या जखमी अवस्थेत एका परप्रांतीय युवकाला पोलीसांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डोक्याला गंभीर मार लागल्याने उच्चस्तरीय उपचार आवश्यक होते मात्र आर्थिक जबाबदारी कोण येणार हा प्रश्न असताना रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असा मानस बाळगणारे १०८ रुग्णवाहिकेचे डॉक्टर अक्षय गुठे यांनी पुढाकार घेऊन खाजगी रुग्णालयात दाखल केले. सदर रुग्णांवर यशस्वी उपचारानंतर तो सुखरूप बेंगलोर येथे आपल्या घरी गेला. डॉक्टरांनी सेवाधर्म पाळल्याने मृत्यूची झुंज देणाऱ्या युवकाचे प्राण वाचले.
‘’देवतारी त्याला कोण मारी’’ ही म्हण लागू होते.ह्या म्हणीची प्राचिती नुकतेच ग्रामीण रुग्णालयात आलेल्या अपघातग्रस्ताला वाचविण्या साठी झालेल्या प्रयत्नानंतर आली. काही दिवसापुर्वी देऊळगावराजा जवळ झालेल्या अपघाता मधे एक युवक गंभिर जखमी झाला होता त्या रुग्णाला PSI हेमंत शिंदे हे ग्रामीण रुग्णालय देऊळगावराजा येथे दि.२८ जून रोजी रात्री घेऊन आले रक्ताने माखलेल्या युवकाची ओळख पटत नव्हती . युवकाच्या डोक्याला गंभिर मार असल्या परिस्थिती गभिर होती.ओळख पटवण्यासाठी पोलीसाचे अथक प्रयत्न चालु होते रुग्णाची श्वासगती कमी होत असल्या मुळे डॉ.अक्षय गुठे व डॉ.प्रीती दिवाकर यानी श्वसनलिका टाकायचे ठरवले.
त्यानंतर रुग्णाला अपतकालीन सेवा १०८ सह जालना येथे घेऊन जात असताना पोलीसाच्या प्रयत्नाने गाडीच्या चेचीस नंबर वरुन युवकाची ओळख पटवण्यास यश आले. रुग्ण हा ओडिसा चा रहिवासी असुन मुकेश पांडा वय २५ देऊळगावमही मधे नातेवाईक जवळ आलेला होता. त्याना संपर्क केला असता
नातेवाईकाच्या विनंती वरुन रुग्णास जालना येथे संत गजानन हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले.डॉ. कुलभूषण मराठे यानी कोणतीच मुभा न ठेवता उपचार चालु केले.आज १३ दिवसानंतर रुग्णाला सुट्टी देण्यात आली.नातेवाईकानी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर अक्षय गुठे, डॉ. प्रीती दिवाकर, एपिआय हेमंत शिंदे, डॉ.मराठे, वाहन चालक संदीप बुधवत याचे आभार मानले.