देऊळगाव राजा : अशरफ पटेल : जगाच्या प्रत्येक क्षेत्रात सोशल मीडिया हा प्रभावी ठरत आहे. समाजसेवक, राजकीय नेता, चित्रनगरीतील अभिनेता व व्यवसायिक यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हा खूप प्रभावी ठरत आहे. तसेच राजीकीय क्षेत्रातील नेते सोशल मिडियाच्य माध्यमातून आपल्या कामांचा गवगावा करतात. परंतु या नेत्यांची सोशल मीडियावर काही चर्चा आणि फॉलोवर्स होताना दिसत आहे. लोकसभा २०२४ या निवडणुकीत बुलढाणा लोकसभा मतदारसंघात २१ उमेदवार मैदानात उतरले आहे. त्या उमेदवारांपैकी मोजके उमेदवारांनी सोशल मीडियात या माध्यमातून द्वारे प्रचाराला सुरुवात केली. साप्ताहिक मातृतीर्थ एक्सप्रेसच्या सर्वेनुसार लोकसभेचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांचे काही दिवसातच सोशल मीडियावर लाखोच्या संख्येत फॉलोवर्स वाढले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ७ आमदार आणि १ खासदार आहे. यांचेही आतापर्यंत एवढे फॉलोवर्स सोशल मीडियावर होताना दिसत नाही. या लोकसभेत मतदारांचे यादी मध्ये आतापर्यंत एक नंबर वर रविकांत तुपकर यांची सोशल मीडियावर जादू चालताना दिसून येत आहे.
दि.१४ एप्रिल रोजी घटनेचे शिल्पकार महामानव यांच्या जयंती अभिवादन करुण बुलढाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी प्रचाराला सुरुवात केली. या शुभ दिनी जे कोणाला जमला नाही हे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून करून दाखवला आज रोजी पक्षाच्या उमेदवारांच्या लाखो करोडो रुपयांच्या वार रूम असतात..पन तुपकरांकडे वार रूम नाहीये… लोकांनीच त्यांचा सोशल मीडिया हातात घेतलाय त्यामुळे आज रोजी ते सोशल मिडियावर नंबर वन पोझिशन वर आले. आज त्यांनी साप्ताहिक मातृतीर्थ एक्सप्रेसला प्रतिक्रिया दिली.
माझ्या संपूर्ण आयुष्यात मी कधीही पैसा संपत्ती याची लालसा ठेवलेली नाही कारण मला संपत्ती आणि पैसे पेक्षा जास्त लाख मोलाची माणसे कमवायची होती ते मी कमवली आणि जीवापाड प्रेम करणारी माणसे आज माझ्यासोबत आहे ही माझी सर्वात मोठी संपत्ती आहे. आज मी लोकसभेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलो आहे. ही सर्व ताकत मला दुपार प्रेम करणारी माणसं माझी सोबत असल्यामुळे आज माझा सोशल मीडियावर प्रभाव पडताना दिसत आहे.