कार्यकारी अभियंता राऊत यांचे प्रतिपादन
देऊळगांव राजा : अशरफ पटेल : सरकारी अधिकारी म्हटलं की सेवानिवृत्त, बदली व नियुक्तीचा खेळ पाठशिवणीला कायमचा ठरलेलाच असतो. पण मिळालेल्या सेवेच्या कालावधीत त्या भागात केलेले काम,राबविलेल्या उत्तमोत्तम अभिनव योजना, तुमची कार्यशैली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सहकाऱ्यांना दिलेली वागणूक बि.एन काबरे यांनी आपल्या ३३ महिन्याच्या कार्यकाळात यांसारख्या बऱ्याच गोष्टी त्यांची ओळख सेवानिवृत्त झाल्यानंतर देखील कायम राहणार आहे. अन पुढच्या आयुष्या कड़े प्रस्थान करण्याआधी त्यांना दिला जाणारा निरोपाचा सन्मान सोहळा हे तुमच्या केलेल्या कामाची पोचपावती असते. असे मत कार्यकारी अभियंता सुभाष राऊत यांनी व्यक्त केले.
अशाच एका ‘दबंग आणि जिगरबाज’ बांधकाम विभागाचे उपभियंता बि. एन. काबरे यांचा निरोप समारंभ दि.३१ जुलै रोजी स्थानिक गोकुळ हॉटेल च्या सभागृहात पर पडला. या छोटेखानी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कार्यकारी अभियंता सुभाष राऊत हे होते. याप्रसंगी सर्व शाशकीय ठेकेदार, अधिकारी , कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते. यावेळी उपस्थित ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांनी उपविभागीय अभियंता बि. एन. काबरे यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव सांगितले. गणेश सवडे यांनी सांगितले की, काबरे साहेबांनी आपल्या ३३ महिन्यात कार्यकाळात त्यांना यश प्राप्ती साठी कठोर परिश्रम केले. त्यांनी कामाला महत्त्व दिले आणि करून दाखवले. सत्काराला उत्त्तर देताना बि.एन काबरे म्हणाले की, आज मी सेवानिवृत्त होतो परंतु मला माझ्या कार्यकाळात अधिकारी कर्मचारी व ठेकेदार यांच्या दिलेल्या साथ मुळे मी यशस्वी ठरलो त्यामुळे सर्वांचे आभार व्यक्त केले. खरंतर बांधकाम विभागत निवृत्तीच्या वेळी अशा प्रकारे समारंभातून निरोप दिला जातो. मात्र, बढतीवर बदली झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्याल अशा अनोख्या पद्धतीने प्रथमच जाहीर निरोप समारंभ झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार गणेश सवडे यांनी केले. याप्रसंगीमहेश भाले, गजेंद्र सिंग राजपूत, संजय पाटील, संतोष आढाव, अभंग जाधव, अनिल बडे, इंगळे, सुरडकर, शेटे मॅडम, गिरी मॅडम, चेके मॅडम, डुरे मॅडम, खांडेभराड मॅडम, सरोदे, दत्ता रेनाकाळे, जगदीश सावरकर, शिवाजी खांडेभराड, नसरुद्दीन सिद्दिकी, मुनीर सिद्दिकी, जनार्दन गवई, प्रल्हाद खांडेभराड, मनोज खांडेभराड, राजू काटे, नाथाभाऊ दराडे, मुळक, हुसे, अजय बिल्लोरे, संजय भुसारी, भाई दिलीप खरात, गजानन पवार, गणेश बुरुकुल, विकास गवई, प्रा. इंगळे आदि उपस्थित होते.