सी सर्ट व बी सर्ट परीक्षेत बजावली देदीप्यमान कामगिरी
देऊळगांव राजा : प्रतिनिधी : स्थानिक श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील एन.सी.सी. कॅडेट्सनी बी. सर्ट व सी सर्ट परीक्षेत सुयश संपादन केले. महाविद्यालयातील एन.सी.सी. युनिट हे १३ महाराष्ट्र बटालियन, एन.सी.सी. खामगाव येथील कमांडिंग ऑफिसर कर्नल अमित भटनागर, रिसलदार मेजर धर्मेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यान्वित आहे.
या महाविद्यालयातील एन सी सी युनिट द्वारे २०२३-२४ मध्ये झालेल्या सी सर्ट परीक्षेत सीनियर अंडर ऑफिसर वैभव तळेकर, ज्युनिअर अंडर ऑफिसर निकीता सवडे, सार्जंट शुभम खांडेभराड, कार्पोलर माधुरी मलवर, कॅडेट कृष्णा लटके, कॅडेट किरण नाथ, कॅडेट शरद नन्हई व कांचन कोल्हे हे ०८ कॅडेटस ए व बी ग्रेडसह उत्तीर्ण झाले. हे सर्व उत्तीर्ण कॅडेट्स सरळसेवा भरतीसाठी होणार्या मुलाखतीसाठी पात्र आहेत. दरवर्षी एन.सी. सी. स्पेशल स्कीम एंट्री(एसएससी) द्वारे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) मध्ये १०० कॅडेट्सची निवड केली जाते. एन.सी.सी. बी. सर्ट. परीक्षा २०२३-२४ मध्ये देखील महाविद्यालयातील कॅडेट्सनी १०० % यश संपादित केले आहे. दिनांक २० जून ते २९ जून २०२४ दरम्यान १०५ सी ए टी सी कॅम्प हा खामगाव येथे संपन्न झाला. या कॅम्पमध्ये महाविद्यालयातील ३४ एन.सी.सी. कॅडेटसनी सक्रीय सहभाग नोंदवला. यशस्वी एन.सी.सी. कॅडेट्सना महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी माजी एन सी सी अधिकारी डॉ. अनंत आवटी व डॉ. विनोद बन्सिले यांनी कॅडेट्सना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी एन सी सी विभागाने यशाची परंपरा कायम राखल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. कॅडेट्सच्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त व महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी लेफ्टनंट डॉ. महेश तांदळे, केअर टेकर ऑफिसर डॉ. गजानन तांबडे यांच्यासह सर्व कॅडेट्सचे अभिनंदन केले आहे.