देऊळगाव राजा : अशरफ पटेल : ई-केवायसी न केल्यामुळे अनेक शेतकरी पीएम किसान सन्मान निधीच्या लाभापासून वंचित राहणार असल्याचे एकंदरीत चित्र आहे. दरम्यान, ई-केवायसी न केल्यामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणा किंवा अन्य शासकीय योजनांचा लाभ ही या शेतकऱ्यांना मिळण्यात मोठ्या अडचणी निर्माण होण्याची भीती आहे.
दुसरीकडे ई-केवायसी पूर्ण केल्याशिवाय या शेतकऱ्यांची लाभाची रक्कमही त्यांच्या बँक खात्यात जमा होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्राधान्याने ई-केवायसी करावी, असे आवाहन तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी केले आहे.
सन २०२२ मधे सततचा पाऊस व एप्रिल २०२३ व नोव्हेंबर २०२३ मध्ये आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ज्या शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झालेले आहे. मात्र या शेतकऱ्यांनी अद्यापही जो ई-केवायसी केलेली नाही त्यांच्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर हो शहरी भागासाठी सेतू केंद्रावर दि.२४ मे व दि.२८ मे रोजी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. इ केवायसी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित ग्रामपंचायतीत जाउंन तसेच शहरी भागातील शेतकऱ्यांनी शहरातील सेतू केंद्रावर जाऊन आपली प्रलंबित ई- केवायसी प्रधान्यानने पूर्ण करुण घेण्यात यावी असे आवहान तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी केले आहे.