अर्णी : कादर डोसानी : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा या शिकवनी नुसार मेमन समाज संपूर्ण देशात व्यापारा सोबत भावी पिढीस शिक्षणा कडे प्रवृत्त करण्या चे सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मेमण समाजाची मातृसंस्था असलेली ऑल इंडिया मेमण जमात फेडरेशन मुंबई ही देशातील पाचशे मेमण जमात चे संघटन एका सुत्रात बांधुन बेघरांना स्वताचा निवारा, गरीब रुग्णांना मदत तसेच आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्याचे काम १९७१ पासुन अविरत करत आहे. तसेच शिक्षीत समाजाच्या संघटनेतुन समाजाची सर्वांगीण उन्नती शक्य आहे असे प्रतिपादन ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशन मुंबई चे अध्यक्ष हाजी इक़बाल मेमन ऑफीसर यांनी केले.
दि.१८ मे रोजी आल इंडिया मेमन जमात फेडरेशन मुंबई चे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी इकबाल मेमण ऑफिसर यवतमाळ येथे खाजगी कार्यक्रमात आले असताना त्यांनी आर्णी येथील प्रसिद्ध कंबलपोष दर्गा येथे भेट दिली. त्यांचे समवेत मुंबई येथील फेडरेशन चे राष्ट्रीय सचिव अजीज मच्छीवाला, युथविंगचे चेअरमन इम्रान फ्रुट वाला, युसुफ मलकानी, यासीन डेडा यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी अर्णी मेमन जमात च्या वतीने आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. आयोजित या छोटेखानी कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष आरिज बेग, मुजिब भाई यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना हाजी ईकबाल मेमन ऑफिसर म्हणाले की, येणाऱ्या काळात मेमन समाजा साठी यूनिवरसिटी, स्कूल, आणि हॉस्पिटल ची स्थापना करण्याची योजना आहे. त्यासाठी समाजातील धनवानांनी योगदान द्यावा असे आव्हान यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ,सुत्र संचलन व आभार प्रदर्शन माहुर येथील पत्रकार हाजी कादर भाई दोसाणी यांनी केले. यावेळी झोनल सेक्टरी हाजी फारुख इसानी, हाजी सलीम अकबानी कारंजा येथील मेमण जमात सचिव तसेच सारा मल्टिपर्पज ॲंड एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष अनिस भाई जाडीयावाला, आर्णी मेमण जमात चे अध्यक्ष तसेच नगरसेवक यासीन नागाणी, हाजी शफी सेठ खाकरा, हाजी यूसुफ नागानी, हाजी रफिक राजकोटिया, फारुख धारीवाला, शफी धारिवाला, शोएब धारीवाला, मुस्तफा फाजलानी, कादर ईसानी, आमीन इसानी, मोहसिन नागाणी, अयान नागानी, कादर धारीवाला मेमन समाज बांधव उपस्थित होते.
शेवटी देशात सामाजिक सलोखा व भाईचारा नांदावा अशी दुवा (प्रार्थना)करून कार्यक्रमाचा समारोप झाला.