देऊळगाव राजा : प्रतिनिधी : जिजाऊ इंटरनॅशनल स्कुलच्या वर्ग पाचवी व सहावी च्या विद्यार्थ्यांनी शासकीय रेखाकला एलिमेंटरी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन घवघवीत यश मिळविले आहे. या परीक्षेसाठी श्री.पि.पि. उगलमुगले सर यांनी या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते.
यामध्ये कु. खुशी देवानंद झोटे कु .गौरी विष्णु परसने, कु.अलिजा इर्शाद शेख, कु. रितिका रामेश्वर आकात, सोहम दिपक उगले, आर्यन नंदकिशोर कुटे, रितेश रतन पिंपळे, सोहम प्रवीण मिसाळ, ओम कारभारी पालवे या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. तसेच शाळेच्या संचालिका डॉ. शिल्पाताई कायंदे मॅडम व मुख्याध्यापक सौ. शरयू जाधव मॅडम व श्री.पि.एस खार्डे यांनी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.