जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दीपक बोरकर यांची मागणी
देऊळगांव राजा : अशरफ पटेल : जिल्हा वार्षिक योजनेतून शहरातील नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या शाळा क्रमांक १ आणि शाळा क्रमांक २ या दोन्ही शाळा साठी वाढीव निधी उपलब्ध करुण देने तसेच उर्दू शाळे साठी खोल्या उपलब्ध करुण देण्याची मागणी जिल्हा नियोजन समीती सदस्य दीपक बोरकर यानी केली.
जिल्हा नियोजन समितिची बैठक दि.२६ जुलै रोजी पार पडली. यावेळी पालकमंत्री दिलीप वडसे पाटिल, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार डॉ. राजेन्द्र शिंगणे, किरण सरनाईक, धीरज लिंगाड़े, संजय रायमुलकर, आकाश फुंडकर, राजेश एडके, श्वेता महाले, जिल्हाधिकारी किरण पाटिल, मुख्यकार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा पोलिस अधिक्षक सुनील कडासने, जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड यांच्यासह जिल्हा नियोजन समीती सदस्य दीपक बोरकर उपस्थित होते. मागील वर्षात नगर परिषद अंतर्गत चालणारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मराठी प्राथमिक शाळेची इमारत जीर्ण झाल्याने पढण्यात आली होती. त्या शाळेच्या नवीन इमारतीसाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदच्या वतीने १ कोटी ३१ लाखांचा निधी नुकतेच मंजूर झालेला आहे. शाळेची इमरात मोठी असल्याने मंजूर झालेले १ कोटी ३१ लखाचा निधी कमी पडू शकतो त्यासाठी त्या करीता वाढीव निधी उपलब्ध करुण द्यावी तसेच शाळाना सोइसुवीधा व उर्दू शाळे साठी विद्यार्थ्यांसाठी बसन्या करिता वर्ग खोल्या उपलब्ध करुण द्यावा अशी मागणी जिल्हा नियोजन समीती चे सदस्य दीपक बोरकर यांनी केली आहे. पालकमंत्री दिलीप वडसे पाटिल यांनी त्यांच्या मागणी ची दखल घेत शाळेच्या कामाला सुरुवात करा निधी कमी पडू देणार असे आश्वासन या बैठकीत दिले.