देऊळगांव राजा : अशरफ पटेल : मा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला असून दि. १६ मार्च पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. सदर निवडणुकीच्या अनुषंगाने ०५ बुलढाणा लोकसभा मतदार संघामध्ये मतदानाच्या तयारीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.
२४ सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात बुलढाणा लोकसभा निवडणुकीची तय्यारी जोरात सुरु आहे, मा.सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाकरिता आवश्यक असलेल्या ई. व्ही. एम. मशीन आणि इतर साहित्य उद्या सकाळी मतदान चमू ला वाटप करण्यासाठी सज्ज झाले आहे. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण ३३६ मतदान केंद्रे आहेत, दि. २६ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाची सर्व तयारी झाली आहे, उद्या दि. २५ एप्रिल रोजी सकाळी ई. व्ही. एम. मशीन आणि इतर साहित्य मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या चमू ला वाटप करण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान चमू मिळालेले मतदान साहित्य घेऊन उद्याच त्यांना नियुक्त केलेल्या मतदान केंद्रावर पोहचणार आहे. मा. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, मा. तहसीलदार सिंदखेड राजा प्रवीण धानोरकर, मा. तहसीलदार देऊळगाव राजा वैशाली डोंगरजाळ, मा. नायब तहसीलदार सिंदखेड राजा मनोज सातव, मा. नायब तहसीलदार डॉ. अस्मा मुजावर, मा. नायब तहसीलदार नितीन बढे,मा. गटविकास अधिकारी देऊळगाव राजा मुकेश महोर, मा. गटविकास अधिकारी सिंदखेडराजा डॉ. श्रीकृष्ण वेणीकर, मा. मुख्याधिकारी सिंदखेडराजा प्रशांत व्हटकर, मा. मुख्याधिकारी देऊळगाव राजा अरुण मोकळ तसेच इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.