Matrutirth Express

Dynamic Date and Time
Weekly E-Paper
ई-पेपर
Weekly E-Paper

देऊळगाव राजा : अशरफ पटेल : गेल्या लोकसभेच्या निवडणूकीत मतदानाचा टक्का घसरलेला होता परंतु येद २०२४ च्या लोकसभेच्या निवडणकीत मतदानाचा टक्का वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी सिंदखेडराजा मतदार संघात पथनाट्य द्वारे, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून संकल्प पत्र, मी मतदान करणार आपल्या देशाचे भवितव्य घडविणार, तसेच मतदान करताना काय करावे व काय करु नये या विषयावर नाट्य सादरीकरण प्रबोधन करण्यात येणार आहे. तरी प्रत्येक नागरिकांनी निर्भय वातवरणात मतदान करुन लोकशाही बळकट करा असे आवाहन सहय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रा.संजय खडसे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले.
स्थानिक पंचायत समिती शिक्षण विभागाच्या सभागृहात दि.१० एप्रिल रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गटविकास अधिकारी मुकेश महोर, पोलिस निरिक्षक संतोष महल्ले, मुख्यधिकारी अरुण मोकळ आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी प्रा.संजय खडसे माहिती देतांना पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील सिंदखेडराजा विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणुकीसाठी नियोजनबद्ध तयारी चालू आहे, लोकशाहीचा हा उत्सव साजरा करण्यासाठी सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील विविध उपक्रमातुन मतदानासाठी जनजागृती करण्यात आली. तसेच मतदान जनजागृतीसाठी सलोगनच्या माध्यमातून नागरिकांच्या पर्यंत पोहचविण्यात येते. त्यात “गरीब-श्रीमंत, जात-धर्म-लिंग या भेदापासून दूर म्हणजे आपले मत, सर्वांना समान अधिकाराच्या तत्त्वाची प्रतिबिंब म्हणजे आपले मत”, “लोकशाहीतील समानतेचे ही मूल्य अधिक बळकट करूया, चला आत्मविश्वासाने मत देण्याचा निर्धार करूया.”, “आपलं पहिलं मत, म्हणजे देशाच्या जडणवीतला पहिले योगदान”, “जागरूक आणि जाणकार मतदार होऊ या, माहितीच्या आधारे योग्य उमेदवार निवडून या”, “प्रलोभन मुक्त निवडणुकीचा निर्धार करू, उत्सव लोकशाहीचा साजरा करू ” विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येते. या निवडणुकीत अनेक बदल करण्यात आले आहे. प्रशासनाची चोख नरज मतदानाच्या दिवशी राहणार आहे. कोणतीही घटना होवू नये याची दक्षता घेण्यात आली आहे. प्रत्येक कर्मचाºयांना जागदाºया देण्यात आल्या आहे. लोसभा निवडणुकीला प्राधान्य देऊन प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन यावेळी केले. याप्रसंगी तालुक्यातील पत्रकार बहुसंख्येत उपस्थित होते.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!