मुस्लिम समाजाचे तहसीलदारांना निवेदन
देऊळगाव राजा : इस्लाम धर्माचे अंतिम पैगंबर मोहम्मद (सल.) यांच्या बद्दल अक्षपार्य विधान करणारे श्री रामगिरी महाराज यांच्याविरुद्ध कायदेशीर गुन्हा नोंदवा अशी मागणी एका निवेदनाद्वारे मुस्लिम समाज बांधवांनी केली आहे.
श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथे प्रवचनादरम्यान श्रीराम गिरी महाराज यांनी द्वेष भवानीतून धर्माचे पैगंबर हजरत मोहम्मद सल. यांच्या बद्दल आक्षेपार्य व चुकीचे विधान केले. सोशल माध्यमावर श्रीराम गिरी महाराज यांचे तीन मिनिटांचे प्रवचन व्हायरल होत असून या प्रवचनात इस्लाम धर्माचे अंतिम पैगंबर यांच्या विषयी आक्षेपार्य व खोटे विधान करण्यात आल्याने मुस्लिम समाजा च्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहे. सदर निवेदनात श्री रामगिरी महाराज यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदनावर मो. ईसाक, शेख फरीद, अकबर बागवान,अजहर खान,हाजी मो सिद्दिक, आदिल कुरेशी, नासेर जनतासेवा, अख्तर शाह,आवेज बागवान,अल्ताफ कुरेशी, मोहम्मद नसीर,म. तोहीद कुरेशी, मोहम्मद शेहजाद अरबाज, शेख सलीमउद्दीन, राहील खान, खानसाकीब, आदिल खान,मोहम्मद रजा, शेख साजिद, शेख इम्रान,शेख हण्णान आदींच्या स्वाक्षरी आहे. सदर निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले असून शासनाने समाजात जातिवाद पसरवून कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या संबंधित महाराजाविरुद्ध तात्काळ कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.