करो योग रहो निरोग
देऊळगाव राजा : अशरफ पटेल : जागतिक योग दिनानिमित्त येथील राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाची आरोग्य समस्या अधिक जटील होत चाललेली आहे. त्यामुळे मानवी जीवनातील आनंद, सुख, शांती, हरवत चालल्याचे चित्र दिसत आहे.भौतिक सुखाच्या पाठीमागे धावताना आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होतांना दिसते आहे. प्रत्येकाच्या आरोग्याचे संवर्धन होऊन प्रत्येकाला निरामय जीवन व दीर्घायुष्य लाभावं यासाठी योगमय जीवनशैली अंगीकारणे महत्त्वाचे आहे.यासाठीच प्रत्येकाने दररोज योग- प्राणायाम,ध्यान,साधना करणे महत्त्वाचे आहे.
दहाव्या जागतिक योग दिनाच्या निमित्ताने सालाबादाप्रमाणे याही वर्षी एक दिवशीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी सकाळी आठ वाजता राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थ्यांना स्कूलच्या शिक्षिका पल्लवी संत यांनी विद्यार्थ्यांना योगाचे मार्गदर्शन करून योगाचे पाठ देण्यात आले विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे या योगाभ्यास प्रशिक्षणाला प्रतिसाद दिला यावेळी राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल च्या अध्यक्षा सौ. डॉ.मीनलताई शेळके , सचिव डॉ. रामप्रसाद शेळके, सीईओ सुजित गुप्ता, अकॅडमीक हेड डॉक्टर प्रियांका देशमुख, फैजल उस्मानी, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रीना निर्मल मॅडम यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षक , शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली