देऊळगांव राजा : अशरफ पटेल : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बोर्ड परीक्षेत राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे.
दहावीच्या बोर्ड परीक्षेत तृप्ती शिंगणे हीने ९४.८ टक्के गुण घेऊन विद्यालयातून अव्वल स्थान मिळवले आहे. तर अनुष्का वाघमारे ही ९४.४ टक्के गुणासह व्दितीय व शलाका खरात ९४.२ टक्के गुण घेऊन तृतीय स्थान मिळविले आहे. तसेच मंदार पेटकर ८६ टक्के, वेदश्री ८५.५ टक्के, शुभम नागरे ८२.४ टक्के , सृष्टी दूनगहू ८१ टक्के , प्रज्वल डोईफोडे ८०.२ टक्के , रितू राठोड ७७ टक्के आणि दुर्व पेटकर ७६.८ टक्के गुण घेऊन प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.
विशेष म्हणजे तृप्ती शिंगणे या विद्यार्थिनीने कोणतेच खाजगी शिकवणी क्लास न लावता ती पुढील शिक्षणासाठी बाहेरच्या क्लास मध्ये शिष्यवृत्ती साठी निवड झाली असून शाळेच्या विद्यार्थांनी बाहेर कोणतीच खाजगी शिकवणी न लावता स्वंय अध्ययनावर भर देऊन अथक परिश्रमातून शाळा व्यवस्थापन तसेच शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे यश मिळविले आहे . यामुळे पालकांमध्ये आनंदाचे वातावरण असून परिसरातील सर्वच स्तरातून या गुणवंतांवर कौतुकाची थाप पडत आहे.
संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मीनलताई शेळके , सचिव डॉ. रामप्रसाद शेळके तसेच शाळेचे सीईओ श्री. सुजित गुप्ता सर विद्यार्थ्यांची प्रगती घडवण्यासाठी स्वतःला झोकून देणाऱ्या आणि १०० टक्के निकाल मिळवणाऱ्या शिक्षकांच्या प्रयत्नांची व्यवस्थापनाने प्रशंसा केली. पुढाकार घेणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये बाळासाहेब गोजरे, आदेश शर्मा, फैसल उस्मानी, आकाश अग्रवाल, खूबचंद वर्मा, कुलदीप सिंग यांचा समावेश आहे. .आणि सर्व शाळा व्यवस्थापनाच्या वतीने व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने सर्व गुणवंतांचे मनःपूर्वक अभिनंदन केले तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.