देऊळगांव राजा : प्रतिनिधी : सद्या लोकसभेची रंण घुमाळी सुरू आहे. त्या अनुषंगाने बुलढाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांची रॅली देऊळगाव राजा पोहोचली या रॅलीला शहरवासीयांनी उत्साहाफूर्त प्रतिसाद दिला आहे.
स्थानिक बस स्थानक चौकात दि.१५ एप्रिल रोजी दुपारी
‘वन बुलढाणा मिशन’चे संदीप शेळके म्हणाले की, जनतेचा नेत्यांवर दबाव हवा… राजकीय दादागिरी मोडून काढा
‘वन बुलढाणा मिशन’चे संस्थापक संदीप शेळके यांनी प्रस्थापित नेत्यांवर शाब्दिक हल्ला चढविला. प्रस्थापित नेत्यांची दादागिरी व हुकूमशाही मोडीत काढण्याचे आवाहनही त्यांनी केले. लोकशाहीमध्ये जनता व मतदारांचा नेत्यांवर ‘विधायक दबाव’ असणे अपेक्षित आहे. मात्र सुसंस्कृत राजकारणाची परंपरा असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात वेगळेच चित्र आहे. सध्या नेतेच जनतेला दबावात ठेऊन सर्रास दडपशाही करत आहे, त्यांना या लोकसभेच्या निवडणुकीत जागा दाखवा आज बुलढाणा जिल्हा विकासापासून कोसो दूर आहे. मी खासदार झाल्यावर जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलून टाकनार असे यावेळी सांगितले. या रॅलीत बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.