बुलढाणा : अशरफ पटेल : मतदान केंद्रामध्ये फोटो काढणे किंवा व्हिडिओ चित्रीकरण करणे यावर बंदी असतानाही ईव्हीएम मशीनवर मतदान करतानाचे फोटो व्हायरल होत आहे. काही अति उत्साही समर्थकांकडून आपल्या उमेदवाराला केलेल्या मतदानाचे पुरावा म्हणून व्हायरल झाले आहेत. अर्थातच मतदान केंद्र अधिकारी झोपा काढत आहेत की जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत, हा प्रश्न उपस्थित होत आहे. अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांच्या “पाना” निशाणी समोर ईव्हीएम वरचे बटन दाबताना चा फोटो सोशल मिडियावर वाहरल होत आहे. घाटाखालून आणि घाटावरून दोन्ही ठिकाणावरून त्यांच्या बाबतीतले फोटो व्हायरल होणे, हा कार्यकर्त्यांचा अतिउत्साह असल्याचे स्पष्ट आहे. विशेष म्हणजे केवळ इतरही काही उमेदवारांचे असेच फोटो काही मोबाईलवर दिसून आले आहेत. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी सदर प्रकाराला आळा घालावा, जेणेकरून असे फोटो इतरही विरोधी मतदारांचे मन वळवू शकतात, अशी मागणी विरोधक करीत आहेत. असे काही फोटो आपल्याकडे आल्यास साप्ताहिक मातृतीर्थ एक्सप्रेसच्या मेल वर पाठवा.