मुख्याधिकारी अरुण मोकळ यांचे आहवान
देऊळगांव राजा : अशरफ पटेल : स्त्री पुरुष समानता साध्य करणे आणि सर्व महिला आणि मुलींना सक्षम करणे हे शाश्वत विकास ध्येयांपैकी एक ध्येय आहे. महिलांना आर्थिक, सामाजिक आणि राजकीय उपक्रमांत संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध धोरणे, कार्यक्रम आणि योजना राबवण्यात येत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा असे आवहान मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
लाभार्थी महिलांनाची पात्रता खाली प्रमाणे आहे. राज्यातील विवाहित, घटस्फोटीत, परीतक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक विवाहित महिला विमान वयाचे २१ वर्ष पूर्णव कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होई पर्यंत लाभार्थ्यांचे कुटुंबाला एकूण वार्षिक उत्पन्न २.५० लाख मर्यादित असावे सादर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहे. १) जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाण पत्र, आदिवासी प्रमाणपत्र पैकी कोणताही एक, २) रेशन कार्ड, ३) बँक पासबुक, ४) आधार कार्ड, ५) पासपोर्ट साइज फ़ोटो, सदर ऑफलाइन किवा ऑनलाइन भरता येणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्या करिता नारीशक्ति एपचा वापर करवा अधिक माहिती साठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कक्ष नगर परिषद देऊळगांव राजा यांच्याशी संपर्क साधवा. तरी गरजू व पात्र महिला लाभार्थ्यांनी सादर योजनेचा लाभ घ्यावा असे आवहान मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी केले आहे.