जयशिवसंग्राम संघटना आक्रमक
देऊळगांव राजा : अशरफ पटेल : तालुक्यातील : देऊळगाव मही येथे ३३ के.व्ही. सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या देऊळगाव मही येथे अनेक ठिकाणी उघड्यावर रोहित्र असल्यामुळे गावातील नागरिकांना व लहान मुला मुलींना आपला जीव मुठीत घेऊन त्या रोहित्रापसून ये जा करवा लागत असल्याने नाहक त्रास सहन करवा लागत आहे. त्यामुळे महावितरण विभागाचा भोंगळ कारभार दिसून येत असल्याने तालुक्यातील गावात असलेल्या रोहित्रा ची दुरुस्ती करुण त्या भागाला संरक्षण भींत तत्काळ बांधकाम करावे अन्यथा जयशिवसंग्राम संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आला.
तालुक्यातील देऊळगाव मही येथील गजानन महाराज मंदिर शाळा
असल्याने या रस्त्यावरील उघड्यावर रोहित असल्याने नागरिकांना अनेक त्रास सहन करावा लागत असल्याने वारंवार महावितरण विभागाला लेखी व तोंडी तक्रार करण्यात आली परंतु महावितरण विभागाला कोणाच्या जीवाची परवा नसल्याने त्यांचा भोगळ कारभार दिसून येत आहे.
त्यामुळे जनतेमध्ये रोष निर्माण होत आहे. गावातील अनेक ठिकाणी उघड्यावर ( ओपन ) डीपी असल्याने रोजच त्रास होत आहे. कनिष्ठ अभियंता यांना फक्त वसुलीवर जास्त लक्ष आहे.
देऊळगाव मही गावात व परिसरातील उघड्यावर ( ओपन )असलेल्या डीपी याची तत्काळ दुरुस्ती करून द्यावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल अन्यथा जय शिवसंग्राम संघटना आक्रमक भूमिका घेईल यात कायदा स्वयस्ता निर्माण झाल्यास उपविभाग्य अधिकारी व कनिष्ठ अभियंता हे जबाबदार राहील असा इशारा निवेदनद्वारे देण्यात आला. या निवेदनावर तालुका अध्यक्ष जहीर खान पठाण, शहराध्यक्ष अजमत खान, युवक शहराध्यक्ष शंकर वाघमारे, अनिश शहा, आदिल शेख, राजू शेख, संतोष हिवाळे, सुरेश निकाळजे, अदनान खान, साबीर खान, असलम पठाण, मुबारक चाऊस, शेख इम्रान, आदिल शहा, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.