देऊळगांव राजा : अशरफ पटेल : जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रा.संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून मतदार जनजागृतीसाठी स्वतः आपल्या आवाजात गीत तयार करून एक वेगळा उपक्रम राबवित आहे.
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रा.संजय खडसे आणि सौभग्यवती खडसे यांच्या मधुर आवाजात मतदान जनजागृती साठी गीत दि.१५ एप्रिल रोजी सादर करण्यात आलेला आहे. मतदान प्रक्रिया हा लोकशाहीचा उत्सव आहे. या उत्सवात प्रत्येक मतदाराने मतदान करुन आपला सहभाग नोंदवावा यासाठी या गीतांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे.
सिंदखेड़राजा विधानसभा क्षेत्राचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रा.संजय खडसे त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती खडसे सोबत गीतांची निर्मिती केली आहे. पारंपरिक चालीवर असलेल्या या गीतांचे लेखन, गायन दोन्ही सोबत राहून केले. आज हा मतदान जनजागृती गीत आपल्या सेवेत सादर करण्यात आलेला आहे.