खामगांव : विशेष प्रतिनिधी : अधर्मी भाजप सोबत हात मिळवून बाळासाहेबांची शिवसेना फोडणाऱ्यानी भगव्याशी गद्दारी केली आहे. जिजाऊंच्या भूमीत भगव्याशी गद्दारी करणारा व्यक्ती शिल्लक राहता कामा नये. शिवसेनेने राजकीय जन्म देणारा आपल्या आईशी बेईमान झाला. एका बाजूला तो उभा आहे तर दुसऱ्या बाजूला एकनिष्ठ शिवसैनिक नरेंद्र खेडेकर हेच असल्याने बहुमाताने विजय करा असे आहवान उपस्थितान ना केला.
स्थानिक मैदानात दि.२२ एप्रिल रोजी बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे जाहीर सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. उध्दव ठाकरे यानी विजयाचा विश्वास देण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील जनतेने या सभेत उपस्थित राहून विजयाचा नारा दिला. या प्रसंगी मुकुलजी वासनिक,तेजसजी ठाकरे, अंबादासजी दानवे, नितीन बापू देशमुखजी, राजेशजी एकडे, धीरजजी लिंगाडे, सुबोधजी सावजी, हर्षवर्धनजी सपकाळ, दिलीपजी सानंदा, कृष्णरावजी इंगळे, नानाजी कोकरे , गणेशजी पाटील, विजयजी अंभोरे, संजयजी राठोड, शामजी उमालकर, रामविजयजी बुरुंगळे, स्वातीताई वाकेकर, जयश्रीताई शेळके, धनंजयजी देशमुख, हाजी दादू सेठ,साहेबराव सरदार, दत्ताजी पाटील, संतोषजी रायपुरे, ज्ञानेश्वरजी पाटील, छगनजी मेहत्रे, दत्ताजी भुतेकर, भास्करजी काळे, मुख्तारजी राजपूत, आशिषजी रहाटे,राहुलजी बोंद्रे, रेखाताई खेडेकर, नरेशजी शेळके, प्रसंजितजी पाटील, वसंतरावजी भोजने, जालिंदरजी बुधवत आदि उपस्थित होते. पुढे बोलताना शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे म्हणाले की, नरेंद्र खेडेकर अन्यायावर वार करणारा निष्ठावंत आहे. त्यांच्यासोबत उभा राहा, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी महाविकास आघाडी सोबत रहा आणि विजय करा. यावेळी महाविकास आघाडीतील नेत्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक, माता भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.