देऊळगावराजा : अशरफ पटेल : बारा बलुतेदार महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बैठकी चे आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीत प्रामुख्याने सर्वानुमते सुनील शेजुळकर यांची बारा बलुतेदार संघ तालुका अध्यक्षपद निवड करण्यात आली आहे.
तसेच गजानन रायमल कार्याध्यक्ष, राजेश कांबळे उपाध्यक्ष, सुनील काटकर, सचिव भारत कुऱ्हे, सहसचिव, शांताराम भाग्यवंत कोशाध्यक्ष, राजेश पंडित प्रसिद्धी प्रमुख, झनकलाल पिंपळे संघटक, जयेश तोडरमल सहसंघटक, रघुनाथ गोरे कार्यकारिणी, सदस्य ज्ञानेश्वर पोपट, कार्यकारिणी सदस्य रामदास भोलणकर जेष्ठ मार्गदर्शक म्हणून एकमताने वरील पदाची निवड करण्यात आली आहे. कार्यक्रमामध्ये बारा बलुतेदार समाजाची दशा आणी दिशा म्हणून विस्तृत अशी चर्चा करण्यात आली यासाठी दामोधरजी बिडवे साहेब बारा बलुतेदार महासंघ महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा प्रा.माळी साहेब चर्मकार समाज जिल्हाध्यक्ष बुलडाणा तथा श्री प्रकाश सुरडकर साहेब जिल्हाध्यक्ष लोहार समाज बुलडाणा त बबन कुमटे सर सेच श्री गजानन झगरे साहेब महा.राज्य आदी हजर होते.