देऊळगांव राजा : अशरफ पटेल
देऊळगांव राजा शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर झालेल्या ५१७ लाभार्थ्यांपैकी ज्या घरकुल लाभार्थ्यांनी बांधकाम परवानगी घेतली नसेल तर दि. २५ जून पर्यंत बांधकाम परवानगी साठी प्रस्ताव सादर करणे बंधनकारक आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांनी तात्काळ बांधकाम परवानगी घेण्याचे अहवान मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी केले आहे.
प्रत्येकाच्या जीवनात काही स्वप्नं असतात. ही स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण परिश्रम घेत असतो. या परिश्रमांना आर्थिक नियोजनाचीही जोड दिली जात असते. स्वतःचं घर हे त्यापैकीच एक स्वप्न. हे स्वप्न आपल्यापैकी बहुतांश जण पाहतात. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान आवास योजना राबविण्यात आली त्या अनुषंगाने देऊळगाव राजा शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेतील ५१७ घरकुले मंजूर करण्यात आली. घरकुल बांधकाम करण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. परंतु मंजूर झालेल्या ५१७ घरकुल लाभार्थ्यांनी पैकी काही लाभार्थ्यांनी आजपर्यंत घरकुल बांधकाम परवानगी घेतले नसल्याने दि.२५ जून पूर्वी बांधकाम परवानगीचे प्रस्ताव अनुज्ञाप्ती धारक अभियंता यांच्याकडून प्रस्ताव सादर करणे बंधनकारक आहे अन्यथा घरकुल रद्द झाल्यास त्यासाठी नगर परिषद देऊळगाव राजा जबाबदार राहणार नाही तरी घरकुल लाभार्थ्यांनी तात्काळ घरकुल बांधकाम परवानगी चे प्रस्ताव सादर करावे तसेच दि.२६ जून रोजी बांधकाम परवानगी घरकुला बाबत मार्गदर्शन आयोजित करण्यात आले असून सर्व लाभार्थ्यांनी सकाळी ११ वाजता उपस्थित राहावे असे आवाहन मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी केले आहे.