देऊळगांव राजा : अशरफ पटेल : शहराची ३५० वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेला शंकर प्रासादिक तुरेवाले मंडळ यांचा पलभटी देवी उत्सव रात्रभर रंगला दि. ६ मे रोजी रात्री ४ वाजता ग्रामदैवत श्री बालाजी मंदिरासमोर कागदी दैत्याच्या मुखवटाचे देवीने वध केले . यावेळेस हजारो भाविक भक्तांची उपस्थिती होती .
दि. ६ मे रोजी रात्री बारा वाजता जुना जालना रोडवरील विठ्ठल मंदिर येथे शंकर प्रासादिक पुरवाले मंडळ यांचे पलभटी देवीचे सॉंग बाहेर निघाले . येथील चतुर्श्रृगी देवी मंदिर येथे दर्शन घेऊन आरती झाली त्यानंतर देवीची मिरवणूक पारंपारिक वहिवाटे वरून निघाली जागोजागी घरासमोर महिलांनी देवीचे औक्षण करून ओटी भरली ग्रामदैव श्री बालाजी मंदिरासमोर रात्री तीन वाजता देवीचे आगमन झाले यावेळेस हजारो भाविक भक्त यांची मंदिरासमोर एकच गर्दी झाली होती मंदिरासमोर कागदी दैत्य देवीला दाखवण्यात आले या दैत्याचा वध रात्री चार वाजता देवीने केला हिंगलेश माता की जय च्या गजरात बालाजी फरस दुमदुमून गेले मंदिराला प्रदक्षिणा केल्यानंतर पारंपारिक वहिवाटे वरून जुना जालना रोड येथील विठ्ठल मंदिर येथे सकाळी देवीचे सोंग पोहोचले येथे आरती करण्यात आली व देवीचे सोंग उतरवण्यात आले . महाप्रसादाने या देवीची उत्सवाची सांगता झाली या उत्सवाचे आयोजन शंकर प्रसादिक तुरेवाले मंडळ हे करतात . ३५० वर्षापासून ही परंपरा आजही जोपासली जात आहे.