मंगरूळपीर : विशेष प्रतिनिधी : वैद्यकीय मदतकक्षाच्या शहर प्रमुखपदी मंगरूळपीर शहरातील सर्वसमावेशक, पुरोगामी युवानेतृत्व शेख नावेद यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य वैद्यकीय मदतकक्ष प्रमुख राम राऊत यांनी केली आहे, सदरहू नियुक्ती म्हणजे अडीअडचणीतल्या सर्वसामान्य माणसाच्या मदतीस्तव सदैव तत्पर असणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्षाने केलेला यथोचित्त सन्मान आहे.
शेख नावेद वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील तरुणाईच्या वर्तुळात आपल्या विधायक उपक्रमांच्या माध्यामातून अल्पावधीत अधोरेखित झालेलं युवानेतृत्व आहे, सर्वसामान्य माणसाच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी ते सतत झटत असतात, त्यांच्यातल्या संघटनकौशल्यामुळे सर्वंक्षेत्रारात त्यांनी माणसे जोडली आहेत, अनेक वर्षापासून ते गोरगरीब रुग्णांना मोफत रुग्णालयात पोहोचविण्याचे काम करीत होते, २०१९ या वर्षी कोरोनाची महामारी आली,नाती दुभंगली, माणसे माणसांपासून दूर पळायला लागली, अशा विपरीत परिस्थितीत शेख नावेद यांनी जिवाची तिळमात्र पर्वा न करता रुग्णांना मोफत कोरोना केंद्रावर पोहचविण्याची उल्लेखनीय कामगिरी बजावली, या कार्याची दखल घेऊन संत गोरोबाकाका महिला बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने शेख नावेद यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कोरोना आजार हा एकापासून दुसऱ्याला होणारा असल्यामुळे कोरोना जवळ कोणीच फिरकत नसे रक्तातील नात्यातील व्यक्ती सुद्धा टाळत असे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते अशा प्रतिकूल परिस्थिती शेख नावेद यांनी पायाला भिंगऱ्या बांधून अडचणीतल्या रुग्णांना मदतीचा कृतीशील हात दिला, मंगरूळपीर शहरातील सामाजिक,सांस्कृतिक आणि क्रिडेशी निगडित उपक्रमात शेख नावेद यांचा उत्साही सहभाग असतो, मदतकेंद्राच्या शहर प्रमुखपदी शेख नावेद यांची नियुक्ती झाल्याबद्दल शहरवासियांनी समाधान व्यक्त केले असून नियुक्ती झाल्यापासून सध्या त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे, उपरोक्त नियुक्तीबद्दल शेख नावेद यांनी खासदार भावनाताई गवळी, जिल्हाप्रमुख भागवत सावके शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष वाशिम तालुकाप्रमुख शिवसेना मनिष पाटील गहूले यांचे आभार मानले आहे.