देऊळगांव राजा : अशरफ पटेल : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक सामान्य निरीक्षक मा. श्री. पी. जे. भागदेव यांनी आज सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघाला भेट देऊन निवडणुकीच्या तयारी चा आढावा घेतला.
बुलढाणा लोकसभा निवडणुक २०२४ साठी सिंदखेडराजा प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे. त्यांनी आज सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाला भेट देऊन त्यांनी मा. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्यासमवेत बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या नियोजनाबद्दल आढावा घेतला आणि काही महत्वाच्या सूचना दिल्या.
आज मतदान साहित्य वाटप प्रक्रिया चालू असताना मा. निवडणूक सामान्य निरीक्षक भागदेव यांनी साहित्य वाटपाबद्दल सर्व बाबी तपासून घेतल्या, निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व बाबींची खातरजमा श्री. भागदेव यांच्याकडून करण्यात आली तसेच मा. भागदेव सरांनी प्रशासनाने केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. मतदानासाठी दिव्यांग, महिला आणि युवा अशी आदर्श मतदान केंद्र करण्यात आली आहेत तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने फिरते पथक, स्थिर पथक यांचे कामकाज याची माहिती उपविभागीय अधिकारी प्रा. खडसे यांनी दिली. आजच्या आढावा दौऱ्यामध्ये मा. तहसीलदार सिंदखेड राजा श्री. प्रवीण धानोरकर , मा. तहसीलदार देऊळगावराजा वैशाली डोंगरजाळ, नायब तहसीलदार देऊळगाव राजा डॉ. अस्मा मुजावर,नायब तहसीलदार सिंदखेडराजा मनोज सातव,नायब तहसीलदार सिंदखेडराजा नितीन बढे, गट विकास अधिकारी सिंदखेड राजा डॉ. श्रीकृष्ण वेणीकर, गट विकास अधिकारी देऊळगाव राजा मुकेश महोर, मुख्याधिकारी देऊळगाव राजा अरुण मोकळ, मुख्याधिकारी सिंदखेडराजा प्रशांत व्हटकर तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.