गनी गाजी लिखित’ अपनी मिट्टी की खुशबू’ या पुस्तकाचे प्रकाशन थाटामाटात
लाखनवाडा :(अशरफ पटेल) : भुईमुगाच्या शेंगेचा वरचा टरफल भाजल्याशिवाय आतला दाणा चवदार होत नाही, रान करपले की जोमदार पीक येत असते, मन भाजले की सकस साहित्यनिर्मिती होत असते, उत्पादन आणि निर्मिती यातला फरक ज्यांना कळतो त्यांच्या हातून चिंतनप्रचुर लेखन होत असते, गनी गाजी यांचा आजतागायतचा शब्दप्रवास मूल्यांची बूज राखणारा आहे, गनी गाजी यांच्या अकराव्या पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते होणे
मी माझं भाग्य समजतो असे मनस्वी प्रतिपादन प्रख्यात मराठी, उर्दू कवी, नामवंत निवेदक अजीम नवाज राही यांनी केले.
स्थानिक लष्करिया नूर बानो हायस्कूल अँड मोहम्मद शरीफ ज्युनियर काॅलेज येथील तय्यबनूर हाॅल मध्ये दि. २३ जुलै रोजी उर्दूचे प्रसिद्ध लेखक व सिद्धहस्त पत्रकार गनी गाजी यांचे ११ वे पुस्तक ‘अपनी मिट्टी की खुशबू’ चे प्रकाशन उर्दू व मराठीचे प्रख्यात कवी व नामवंत निवेदक अजीम नवाज राही यांचे हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला शाळेचे सचिव मोहम्मद जीशान, शाळा समिती सदस्य जोरावर खान, शफीउल्ला खान, मोहम्मद रफीक, प्राचार्य जाकीर हुसैन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन गुलाम जाफर यांनी केले तर आभार प्रदर्शन दस्तुरखुद्द गनी गाजी यांनी केले.