देऊळगांव राजा : अशरफ पटेल : “मला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेकांचे फोन आले, अनेकांनी भेटून मला सांगितलं की, ताई आता तुम्ही स्वतः उमेदवार आहेत. आता कसं होईल. त्यामुळे ही निवडणूक खूप अवघड आहे. असं मला देखील वाटलं होतं. पण आता जनतेने ही निवडणूक हातात घेतल्याने सोपी झाली आहे. त्यामुळे माझ्यावर प्रेम करणारे लोकं ही निवडणूक सोपी करतील असं पंकजा मुंडे आपल्या भाषणात म्हणाल्या. तर, मी ग्रामविकास मंत्री असतांना अनेक वाडी, वस्ती, तांड्यापर्यंत रस्ते पोहोचवले. त्यामुळे आता ही निवडणूक सोपी व्हावी म्हणून अनेक अवघड रस्ते पार करून प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी तुमच्यापर्यंत पोहोचली आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा असे प्रतिपादन माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी केले.
दुसरबिड येथील नारायणराव नागरे महाविद्यालयातील भव्य प्राणांगणत खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांची जाहीर सभा घेण्यात आली यावेळी सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार डॉ राजेंद्र शिंगणे, माजी आमदार तोताराम कायंदे, डॉ शशिकांत खेडेकर, आमदार संजय रायमुलकर, आमदार श्वेताताई महाले आदी महायुतीचे पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. पुढे बोलताना माजी मंत्री पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, एकीकडे उन्हाचा पारा वाढत आहे, तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण देखील तापत आहे. अशात प्रचाराच्या माध्यमातून निवडणूक आपल्यासाठी सोपी कशी होईल यासाठी प्रयत्न करत आहे. मी माझा उमेदवारिच्या अर्जावर सह्या केल्या नाही उद्या माझा उमेदवारी अर्ज मी भरणार आहे मी वेळेत वेळ काढून प्रतापराव जाधव यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन करीत आहे तुम्ही प्रतापराव जाधव यांना निवडून द्या मी बीड आणि बुलढाण्याचा विकास करणार याची गॅरंटी देते. कार्यक्रमाची प्रस्ताविक आणि सूत्रसंचालक भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ गणेश मांटे यांनी केले. यावेळी सिंदखेड राजा मतदार संघातील नागरिक बहुसंख्य उपस्थित होते.
“लोकनेत्या म्हणून पंकजा मुंडेंकडे पहिलं जातं” : माजी मंत्री डॉ. शिंगणे
पंकजा मुंडे आल्याने प्रतापराव जाधव यांचे विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. लोकनेत्या म्हणून पंकजा मुंडे आपल्याकडे पहिल्या जाते. देशाची प्रतिमा नरेंद्र मोदी मुळे झालीय. त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. महाराष्ट्राचा विकास होत आहे. कोण प्रगती करू शकतो, याची जाण ठेवणे गरजेचं आहे, असं डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले.
पंकजाताई यांनी दिलेला शब्द काळ्या दगडावरची पांढरी रेष : माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर
माझा सर्वात मोठा सौभग्य मी स्व. गोपीनाथजी मुंडे साहेबा लेक आणि महाराष्ट्राची वाघिन पंकजाताई मुंडे यांच्या सोबत काम केलेला असल्याने त्यांची काम करण्याची पद्दत माला माहित आहे. त्यांच्या प्रतापराव जाधव प्रचारा साठी येण्या मुळे लोकसभेची जगा ही महायुतीला मिळणार आहे. मतदाता नरेंद्र मोदी यांना पुन्हा प्रधानमंत्री करणार आहे अशी अपेक्षा व्यक्त करतो.
१५ वर्षात बुलढाणा जिल्ह्यात विकासाची गंगा वाहत आहे : खा. प्रतापराव जाधव
गेल्या १५ वर्षापासून बुलढाणा जिल्ह्याचा नेतृत्व करताना संसद भावना स्थानिक मुद्दे आणि अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले बचत गटाचे माध्यमातून महिला लखपती होणार त्यांना उद्योग करण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील अनेक अडीअडचणी दूर केले. अनेक प्रश्नांना मार्गी लावली त्यामुळे आज रोजी बुलढाणा जिल्ह्यात विकासाची गंगा वाहत आहे तरी येणाऱ्या २६ तारखेला मला मतदान करून विजयी करावे असे आव्हान यावेळी केले.