फटाक्यांची आतिषबाजी ; पेढे वाटून महायुती सरकारचे मानले आभार
देऊळगांव राजा : अशरफ पटेल : दि. १६ जूलै रोजी महाराष्ट्र शासनाने समस्त मातंग समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक,सांस्कृतिक व राजकीय उन्नतीसाठी साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) स्थापन करणेचा G.R.(शासन अध्यादेश) पारीत करून मंजूरी दिली.यामूळे मातंग समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मातंग समाजाचे युवा नेते सुनिल लोखंडे यांच्या मार्गदर्शनात आज दि. १७ जुलै रोजी स्थानिक बसस्टॅन्ड चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून ढोल – ताश्यांच्या गजरात एकमेकांना पेढे भरवून जल्लोष साजरा केला.गेली अनेक वर्षापासून मातंग समाजातील विविध सामाजिक संघटना तसेच मिशन बार्टीच्या माध्यमातून मातंग तरूण यासाठीच संघर्ष करत होते या अथक संघर्षाला आज यश मिळाले आहे.यातून मातंग समाजाचे उज्वल भविष्य नक्कीच घडेल. हा निर्णय मातंग समाजासाठी विकासाची सुवर्णसंधी आहे हा महाराष्ट्रातील तमाम मातंग बांधवांसाठी फार मोठा आनंदाचा सुवर्ण क्षण आहे. यावेळी मातंग समन्वय समिती प्रवक्ते ॲड.विलास साबळे, राजू गोफणे सर, पत्रकार संतोष जाधव, राज्य समन्वयक माधव गवळी, राजू भाऊ नाडे, नेते किशोर कांबळे, सिताराम गोफणे, रघूभाऊ निकाळजे, गजानन अंभोरे, प्रकाश आव्हाड सर, दिपक बोर्डे, कैलास घाडगे, विठ्ठल पाटोळे, अतिश पाटोळे, राम भाऊ अवसरमोल, अल्पेश गोफणे, सुरेश भाऊ खंदारे, ऋषी भाऊ खंदारे, नंदू लोखंडे, किशोर गायकवाड, अक्षय निकाळजे, राजू लोखंडे, सुनिल लोखंडे, अजय लोखंडे, दिपक लोखंडे, सुशिल कांबळे, गोपीनाथ लोखंडे, पवन अंभोरे, राहूल डोईफोडे, विशाल कांबळे, अनुराग पवार, किशोर गायकवाड, नितीन चव्हाण यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.