अज्ञात चोरट्या विरुद्ध पोलिसात गुन्हा
देऊळगाव राजा : अशरफ पटेल : दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्याने ३५ हजार रुपये रोख रकमेसह ७८ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना मिश्रीकोटकर पेट्रोल पंप परिसरात आज (ता.४)सकाळी उघडकीस आली.
याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार शहरातील मिश्री कोटकर पंपा समोर असलेल्या एका किराणा जनरल स्टोअर चे शटर तोडून अज्ञातू चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला व दुकानातील काउंटर मध्ये डब्यात ठेवलेले गाडी भाड्याचे २८ हजार रुपये, दोन दिवसाचा गल्ला ७ हजार असे एकूण ३५ हजार, तांदळाचे तीन कट्टे एक कट्टा तूर डाळ, बिस्किटचे १५ बॉक्स, निरमा पावडर मसाले पाकीट, काजू बदाम किराणा सह एकूण ८७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. विजय जगन डोके त्र्यंबक नगर सिंदखेडराजा रोड यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.