देऊळगाव राजा : अशरफ पटेल : लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील सिंदखेडराजा विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणुकीसाठी नियोजनबद्ध तयारी चालू आहे. लोकशाहीचा हा उत्सव साजरा करण्यासाठी सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील श्री बालाजी महाराजांच्या पुण्यनगरीत दिव्यांग महिला पुरुष यांच्या माध्यमातून मतदान जनजागृती रैलीचे आयोजन करण्यात आले होते.
लोकसभा निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी तसेच नागरिकांना आपला हक्काचा मतदान करावा यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या माध्यमातून विविध उपक्रमातुन मतदानासाठी जनजागृती करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने दि.१० एप्रिल रोजी सकाळी स्थानिक छत्रपती श्री शिवाजी महाराज हायस्कुलच्या मैदानातून रहएएढ उपक्रमांतर्गत नगरपरिषद देऊळगावराजा, महसूल विभाग देऊळगाव राजा, शिक्षण विभाग, सर्व शाळा महाविद्यालय यांच्या सहभागामधून शहरातून दिव्यांग रॅलीचे, महिलांच्या रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद गावातील नागरिकांकडून मिळाला आहे, या सर्व उपक्रमाचे व्यवस्थापन नगरपरिषद देऊळगावराजा यांच्यावतीने करण्यात आले होते.
आजच्या या कार्यक्रमाला देऊळगावराजा नगर पालिकेचे मुख्याधिकारी अरुण मोकळ तसेच सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.