देऊळगाव राजा : अशरफ पटेल : सकल जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकार श्री भगवान महावीर स्वामी यांचा २६२३ वा जन्मकल्याणक महोत्सव देशासह परदेशात सुद्धा मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला शहरात वास्तव्यास असलेले दिगंबर जैन मुनि षष्टम पट्टाधीश आचार्य श्री समता सागर जी महाराज यांच्या सानिध्यात शहरातील सर्व सकल जैन समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेत श्री भगवान महावीर स्वामी यांचा जन्म कल्याणक महोत्सव साजरा केला.
सकल जैन जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकर व संपूर्ण जगाला अहिंसेचा संदेश देणारे श्री भगवान महावीर स्वामी यांचा २६२३ वा जन्मकल्याणक महोत्सव शहरात वास्तव्यास असलेले षश्ठम पट्टाधीश आचार्य श्री समता सागर जी महाराज यांचे सानिध्यात धार्मिक व सांस्कृितीक कार्यक्रम घेत साजरा करण्यात आला दि. २१ एप्रिल रोजी सकाळी सात वाजता शहरभर प्रभात फेरी काढून या मार्गावरील सर्व जैन मंदिरासमोर भगवंतांना मानवंदना देण्यात आली तर बस स्थानक चौकात नव्याने निर्माण झालेल्या महावीरस्तंभ ला सुद्धा मानवंदना देण्यात आली शहरभर मार्गक्रमित करत भगवंतांचा जयघोष करत सकल जैन समाजाच्या महिला पुरुष युवकांनी शहर दनाणून, सोडले भक्तिमय वातावरणात प्रभात फेरी मध्ये सर्वांनीच भगवंतांचे नामस्मरण केले, त्यानंतर जैन आश्रम मध्ये माजी नगराध्यक्ष कवीश जिंतूरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला तर श्री महावीर मंदिरात उपस्थित समाज बांधवांना आचार्य श्री समता सागर जी महाराज यांनी महावीर जन्मकल्याणक विषयी सविस्तर माहिती दिली यानंतर भगवंतांचा अभिषेक सोहळा पार पडला सायंकाळी पाच वाजता शहरातून रथयात्रा काढण्यात आली रात्री जैन मंदिरात संगीतमय आरतीचे नियोजन करण्यात आले होते व नंतर रात्री भगवंताचा जन्म कल्याणक महोत्सव साजरा करण्यात आला लहान लहान बालक बालकांनी प्रभात फेरी मध्ये झाकीद्वारे समाजाचे व शहरवासी यांचे लक्ष केंद्रित करून घेतले सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व सकल जैन समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले.
Very nice news on day