मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाचे सदस्य रवि आण्णा जाधव यांचे फिल्म इंडस्ट्रीत इन्ट्री
देऊळगाव राजा :- अशरफ पटेल : नागेश फिल्म प्रोडक्शन व आयो जगदंबा भवानी फिल्म यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मीत देश भक्ती वर आधारित खाकी… लय भारी मराठी चित्रपटांमध्ये मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाचे सदस्य रवि अण्णा जाधव यांची निवड करण्यात आली आहे, या निवडीचे पत्र दिग्दर्शक पांडुरंग गोरे संपादक साहेब श्री उद्धव फंगाळ सर यांनी दिले आहे.
तालुक्यातील देऊळगाव मही या गावचे असलेले रहिवासी पत्रकार रवि अण्णा जाधव यांची या खाकी लय भारी म्हणजेच देशाच्या दुष्माणसाठी लय डेंजर भूमिका देण्यात आली आहे.
या चित्रपटामध्ये त्यांची महत्वपूर्ण भूमिका असून लवकरच या मराठी बिग बजेट चित्रपटचे चित्रीकरण १४ ऑगस्ट पासून धूम धडाक्यात चालू होणार आहे.
रवि आण्णा जाधव यांचे मराठी फिल्म इंडस्ट्री मधून सहर्ष स्वागत असे होत आहे. व त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांनी दिरदर्शक पांडुरंग गोरे सर व श्री उध्दव फ़ंगाळ सर याचे आभार मानले आहे की त्यांनी मला जबरदस्त प्लॅटफॉर्म आहे व त्या संधीचे मी सोने करणार आहे व चांगल्या प्रकारे चित्रपटांमध्य दिग्दर्शकाने दिलेली भूमिका पार पडणार आहे पत्रकार रवि अण्णा जाधव यांचा हा पहिलाच मराठी चित्रपट असल्यामुळे सध्या या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता लागली आहे लवकरचं मराठी हा चित्रपत डिसेंबर अखेर पडद्यावर येणार आहे. रवी अण्ण जाधव यांना या मराठी चित्रपटासाठी मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सुषमा राऊत, तालुका अग्ध्यक्ष सौ.जया सन्मती जैन व सर्व सदस्यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.